नक्षली विचाराने भारावलेल्या नक्षलवाद्यांना समाजात पुन्हा एकदा योग्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी देऊन त्यांना रोजगारासोबतच घर उपलब्ध करून देणारा अनोखा प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने राबविला आहे. गडचिरोलीत हिंसा सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या ९३ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची स्वतंत्र वसाहत ‘नवजीवन नवनगर’ आकारण्यात आले. अशाप्रकारे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची ही देशातील पहिली वसाहत मानली जाते.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची देशातील पहिली वसाहत गडचिरोलीत
गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नक्षलवाद्यांचे मन वळवून त्यांना चांगले जीवन जगण्याची उमेद दाखवत त्यांच्यासाठी रोजगारासोबत घरे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देत त्यांच्यासाठी भूखंड उपलब्ध करून दिला होता. चंद्रपूर मार्गावरील नवेगावजवळील मौजा मुरखळा येथे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या नवजीवन नवनगर या वसाहतीचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांनी २५ फेब्रुवारी २०१६ मध्ये केले होते. जंगलातील नक्षली चळवळ सोडून हिंसेच्या मार्गाचा त्याग करणाऱ्या नक्षलवाद्यांना सुखसमाधानाने जगण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने आर्थिक मदतीसह रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. त्याचबरोबर त्यांना राहण्याकरिता घरबांधणीसाठी सरकारच्या महसूल व वन विभागामार्फत भूखंड वितरण योजना २००५ पासून सुरू करण्यात आली होती. दरम्यान, तत्कालीन केंद्र सरकारने आत्मसमर्पित योजनेमध्ये काही बदल करण्याच्या सूचना एप्रिल २०१३ मध्ये राज्याला दिल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन राज्य सरकारने नक्षलवाद्यांसाठी सुधारित आत्मसमर्पण योजना राबविण्याबाबत २६ ऑगस्ट २०१४ रोजी शासन निर्णय काढला होता.
या नवीन सुधारित योजनेद्वारे नक्षल चळवळ पूर्ण बंद करणे व त्यांचे मनुष्यबळ कमी करून त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या स्थानिक लोकांना या चळवळीतून बाहेर काढून पुन्हा नक्षलवादाकडे वळू न देणे, नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे यासाठी आकर्षक योजना तयार करणे, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना जबाबदार नागरिक होण्यासाठी मदत करणे, आदी सुधारणा करण्यात आल्या. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना द्यावयाच्या बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या पदानुसार त्यांना आत्मसमर्पणासाठी रक्कम ठरवण्यात आली होती. यामध्ये किमान दीड लाख रुपयांपासून कमाल वीस लाखापर्यंतचे बक्षिस ठरविण्यात आले. त्या व्यतिरिक्त हत्यारासह आत्मसमर्पण करणाऱ्या सदस्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांचे पुनर्वसन ही महत्त्वाची योजना याद्वारे राबविण्यात आली होती. या योजनेद्वारे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याला घर किंवा घरासाठी भूखंड आणि आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेचा आधार घेत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून घरबांधणीसाठी केलेल्या भूखंडाच्या मागणीनुसार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षकांद्वारे एकूण १०६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भूखंडांचे वितरण करण्यात आले.
राज्य सरकारने या योजनेंतर्गत १४ ऑगस्ट २०१४ रोजी ६५ भूखंड, १४ फेब्रुवारी २०१५ रोजी २८ भूखंड, २३ ऑगस्ट २०१५ रोजी १३ भुखंडांचे वाटप केले. सरकारने आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी ५.५३ हेक्टर जमीन मंजुर केली. या जागेवर नक्षलवाद्यांसाठी ५.५३ हेक्टर जमीन मंजुर करण्यात आली आहे. त्यावर ३० बाय ३० चौरस फुटाचे एकूण १७४ भूखंड तयार करण्यात आले. या जागेवर अंगणवाडी, शाळा, समाज मंदिरासाठी २७६९.३७५ चौरस मीटर, बाजारासाठी ५१३.१३५ चौरस मीटर आणि ३४०८.२० चौरस मीटर मोकळी जागा ठेवण्यात आली. चंद्रपूर मार्गावरील नवेगावजवळील मौजा मुरखळा येथे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवजीवननगर या नवीन वसाहतीचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांनी २५ फेब्रुवारी २०१६ रोजी केले होते. ही देशातील पहिलीच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत आहे.
आत्मसमर्पित नक्षलवादी एसटीत वाहक
गडचिरोलीतील पोलीस प्रमुखांनी राबविलेल्या शिष्टाई धोरणामुळे नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केले. त्यात सरकारने स्वीकारलेल्या सुधारित आत्मसमर्पित नक्षलवादी धोरणामुळे नक्षलवाद्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळत आहे. राज्य सरकारने या नक्षलवाद्यांना उदरनिर्वाहासाठी रोजगारदेखील उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचाच भाग म्हणून एसटी महामंडळाने जवळपास आत्मसमर्पण केलेल्या ६० नक्षलवाद्यांना २०१८ मध्ये एसटीमध्ये वाहक पदाची नोकरी दिली आहे. या नक्षलवाद्यांना रीतसर प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेतले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी स्वीकारलीच होती. पण त्याचबरोबर त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पदही स्वीकरले होते. देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी गडचिरोतील एटापल्ली भागातील बुर्गी या ठिकाणाला भेट दिली. हा परिसर सर्वाधिक नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. याच भागात देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनची सुसज्ज अशी इमारत बांधली. तसेच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी नवजीवन नवनगर या वसाहतीचे भूमिपूजन केले.
इतर लेख