वॉटर मॅन

वॉटर मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वल!

वॉटर मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात देशात निर्माण केलेला आदर्श आज प्रत्यक्षात फळाला येताना दिसत आहे. ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४’ मध्ये महाराष्ट्राने सर्वोत्तम राज्याचा मान पटकावत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. जलसंवर्धन, जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, महाराष्ट्र दुष्काळमुक्त कार्यक्रम आणि नदी पुनरुज्जीवन या क्षेत्रात राज्याने केलेली उल्लेखनीय कामगिरी या सन्मानाचे मुख्य कारण ठरली. या पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई महानगरपालिका ‘सर्वोत्तम शहरी स्थानिक स्वराज्य संस्था’ म्हणून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तर नाशिकच्या कनिफनाथ जल उपयोग सहकारी संस्थेने दुसरा क्रमांक मिळवत ग्रामीण भागातूनही जलसंवर्धनाच्या दिशेने होत असलेल्या प्रभावी प्रयत्नांची साक्ष दिली.

महाराष्ट्राच्या या यशामागे मागील दशकभरात राबवलेल्या जलसंधारणाच्या योजनांचा मोलाचा वाटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाने राज्यातील जलव्यवस्थापनाचा पाया भक्कम केला. या अभियानामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत अडकलेल्या हजारो गावांना जलसुरक्षेचा आधार मिळू लागला. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राबवण्यात आलेली ‘मागेल त्याला शेततळे’ योजना हीसुद्धा अत्यंत परिवर्तनकारी ठरली. लाखो शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जलसाठा निर्माण करत पिकांना बारमाही पाणीपुरवठ्याची नवी वाट निर्माण केली. यासोबतच ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ या उपक्रमाने धरणांची मूळ साठवण क्षमता वाढवली आणि गाळाच्या स्वरूपात मिळालेल्या सुपीक मातीमुळे शेतीची उत्पादनक्षमता वाढली.

राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 महाराष्ट्र

जलसंवर्धनाच्या चळवळीतून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जलव्यवस्थापन फक्त ग्रामीण भागापुरते मर्यादा न ठेवता शहरी जलस्रोतांचे संवर्धन, पर्जन्यजल संधारण, नाले-सांडपाणी व्यवस्थापन यांनाही प्राधान्य दिले. या प्रयत्नांमुळेच नवी मुंबई महानगरपालिकेला देशातील सर्वोत्तम शहरी संस्थेचा सन्मान मिळाला. महाराष्ट्रातील शहरांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, भूजल पुनर्भरणाच्या विविध पद्धतींचा प्रभावी अवलंब करत जलसंपत्तीचे उत्तम नियोजन कसे करता येते, याचे उदाहरण देशाला दाखवून दिले. या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील एकात्मिक जलव्यवस्थापन मॉडेलची देशापातळीवर दखल घेतली गेली. या सर्व प्रयत्नांतून महाराष्ट्राने ‘जल समृद्ध भारत’ या राष्ट्रीय दृष्टीकोनाला सक्षम हातभार लावला. जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वोच्च स्थान मिळणे हे राज्याने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण पावलांचे प्रमाणपत्रच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर जलसंवर्धनाची चळवळ उभी राहिली आणि त्यात महाराष्ट्राने अतिशय प्रभावी योगदान दिले.

जलसंवर्धन महाराष्ट्र

गेल्या काही वर्षांत राज्यातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पर्जन्यजलसाठा वाढविण्याचे उपक्रम, सिंचन क्षमता विस्तार आणि पाणी बचत तंत्रज्ञानाचा प्रसार यांनी महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला भक्कम पाया दिला. ग्रामीण ते शहरी अशा सर्व स्तरांवर उभारलेले हे मॉडेल प्रकल्प फक्त प्रशासकीय बळावर उभारलेले नाहीत. तर यामागे लोकसहभागातून निर्माण झालेली एक मोठी सामाजिक चळवळ दिसून येते. राज्यात निर्माण झालेल्या या जलसंपन्नतेच्या पायावरच आज महाराष्ट्र देशात जलसंवर्धनात अव्वल ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या योजनांमुळे महाराष्ट्रात जलव्यवस्थापनाची संकल्पना ही चळवळीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचली. त्यातूनच राज्याने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. येणाऱ्या काळात हीच ऊर्जा, दूरदृष्टी आणि कार्यकुशलता महाराष्ट्राला आणखी जलसमृद्ध आणि शाश्वत बनवेल.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *