हिंदुत्ववादी

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास: देवेंद्र फडणवीस सरकारचा व्यापक दृष्टिकोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीच आपली हिंदुत्वाची भूमिका लपवून ठेवली नाही. उलटपक्षी, त्यांनी नेहमीच हिंदुत्वाची व्यापक व्याख्या मांडली आहे. त्यांच्या मते, हिंदुत्व हा केवळ धर्म नसून भारतीय संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान आहे. हिंदुत्वाचे तत्वज्ञान फक्त धर्मापुरते मर्यादित नाही, तर त्यामध्ये सामाजिक एकोपा आणि सहिष्णुतेला चालना देण्याची शिकवण आहे. त्यामुळे इथल्या धार्मिक स्थळांचा विकास हा केवळ धार्मिक कार्याचा भाग नसून तो पर्यटन आणि सांस्कृतिक संवर्धनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासाद्वारे राज्याच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच भर दिला आहे.

२०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीमार्फत अ, ब आणि क वर्गातील तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि स्मारकांचा विकास करण्यासाठी शासनाच्या विविध मंजुरी दिल्या गेल्या. मार्च २०२५ मध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास आणि पर्यटन विभागाला सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. यामध्ये कमी खर्चात उच्च दर्जाची कामे करण्यावर भर देण्यात आला.

महाराष्ट्र तीर्थक्षेत्र विकास: त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा विकास

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जागृत देवस्थान असून, दक्षिण भारतातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. २०२६ ते २०२८ या कालावधीत कुंभमेळा आयोजित होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. तसेच या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस (Maharashtra Sevak Devendra Fadnavis) सरकारने ११०० कोटी रुपयांची योजना देखील जाहीर केली. त्याचबरोबर नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यादरम्यान भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अशा मेळावा प्राधिकरणाची स्थापना केली जाणार आहे. यासाठी अधिवेशनाच्या माध्यमातून विशेष कायदा देखील केला जाणार आहे. नुकत्याच प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळाव्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कुंभमेळाव्यासाठीही प्रचंड गर्दी होईल, ही बाब लक्षात घेऊन त्यादृष्टीने सोयीसुविधा उभारण्यावर सरकार भर देणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना सुरू केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी तोडफोड करण्यात आलेल्या देशभरातील अनेक मंदिरांचा पुनर्विकास स्वत:च्या खर्चातून केला होता. त्यांच्या या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने त्यांच्या नावाने तीर्थक्षेत्र विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार राज्यातील ५०० तीर्थस्थळांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या विकासकामाच्या निधीची किमान मर्यादा २ कोटीवरून ५ कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेची व्याप्ती वाढली असून, तीर्थस्थळांच्या पुनर्विकासासाठी ५ कोटी ते २५ कोटी रुपयांपर्यंतचा विकास निधी उपलब्ध होणार आहे.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी तीर्थक्षेत्र विकास

महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १,३२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेचा अभिमान म्हणून उभारला जात आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगासाठी २८६.६८ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यापैकी १२ कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवाला पालखीतळ आणि मार्ग यांचाही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

अशाप्रकारे राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास प्रकल्प राज्य सरकारने तयार केला असून त्यासाठी पुरेशी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यावर भर देखील दिला आहे. यामध्ये पुढील तीर्थक्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. ज्यात गुरूमंदिर तीर्थक्षेत्र (कारंजा, वाशिम) १७० कोटी रुपये, श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी प्रकल्प ७२३ कोटी रुपये,  नंदनवन, नागपूर येथील  लक्ष्मीनारायण व शिव मंदिराचा पुनर्विकास, भांडेवाडी, नागपूर येथील श्री मुरलीधर मंदिराचा विकास, राज्यात विविध ठिकाणी असलेल्या महानुभाव पंथियांची श्रद्धास्थळे असलेल्या रिद्धपूर, जाळीचा देव आदी तीर्थक्षेत्रांचे संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले. 

धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास करताना भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासह पर्यटन आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे उद्दिष्ट फडणवीस सरकारने ठेवले आहे. या योजनांमुळे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचे फक्त धार्मिकच नाही तर आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्वही वृद्धिंगत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *