देशाच्या विकासात पूर्वीपासून महाराष्ट्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र हे एक आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि सुस्थापित राज्य आहे. महाराष्ट्राचे कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात ही मोठे योगदान आहे. हे योगदान अधिकाधिक वाढावे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, या दृष्टिने देवेंद्र फडणवीस यांनी राज्य स्तरावर ‘सीएम चषक’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमुळे शहरे आणि ग्रामीण भागात खेळल्या जाणाऱ्या खेळांना आणि खेळाडुंना अच्छे दिन अनुभवायला मिळाले.
सीएम चषक | CM Chashak Information in Marathi
नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’ या भव्य क्रीडा महोत्सवातून जसे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील असे खेळाडू तयार होण्यास हातभार लागला. त्याच पद्धतीने राज्यातील तरुणांनी विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी फडणवीस सरकारने विशेष प्रयत्न केले. ‘सीएम चषक’ ही स्पर्धा फक्त आयोजनापुरती सिमित न राहता प्रत्यक्ष मैदानातील कामगिरीतून महाराष्ट्रातील तरुणांचे गुण देशासमोर यावेत, यादृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रयत्न केले.
तरुणाई ही भारताची शक्ती आहे. जगभरातील कोणत्याही क्षेत्राचे नेतृत्व करण्याबरोबरच देशाला महान बनवण्याची ताकद या तरुणाईमध्ये आहे. पण ही तरुणाई सध्या मैदानी खेळापेक्षा डिजिटल खेळांमध्ये रमू लागली. जे खेळ प्रत्यक्ष मैदानावर खेळले पाहिजेत, ते खेळ कॉम्प्युटर, टॅब, लॅपटॉप आणि मोबाईलवर खेळले जात आहेत. त्यांना पुन्हा एकदा मैदानावर आणणे गरजेचे आहे. यामुळे त्यांना मैदानी खेळांची गोडी तर लागेलच, पण त्याचबरोबर त्यांचे शरीर सुदृढ होण्यास मदत होईल. त्यांचा सर्वांगिण विकास होईल. यासाठी उभ्या महाराष्ट्रातील खेळाडुंना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे. हक्काचे मैदान मिळावे आणि खेळण्याकरीता प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘सीएम चषक’ सारखी स्पर्धा कामी आली. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक विभागातील, प्रत्येक वॉर्डमधील तरुणांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या स्पर्धेचा आवाका आणि पारितोषिके मोठी असल्याने तरुणांनीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सीएम चषक या स्पर्धेतून प्रत्येक विधानसभा विभागातून ८६४० विजेते खेळाडू काढण्यात आले. त्यानंतर जिल्हा पातळीवर १०८० खेळाडू आणि एकूण राज्यस्तरावर एकूण ३० विजेते काढण्यात आले. यामुळे विधानसभा पातळीवर मोठ्या संख्येने तरुण या खेळांमध्ये सहभागी झाले होते. सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून कला आणि क्रीडा क्षेत्रातील स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते. तसेच या चषकाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या स्पर्धांना रंजक नावे देण्यात आली होती. जसे की, आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्या खो-खो, उडान १०० मीटर धावणे, मुद्रा ४०० मीटर धावणे, स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा, कौशल्य भारत कॅरम स्पर्धा अशी नावे दिली गेली. तर कला स्पर्धेत उज्ज्वला नृत्य स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला आणि मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा अशी नावे दिली गेली. यामुळे तरुण-तरुणींचा स्पर्धांमधील सहभाग वाढला. सीएम चषक स्पर्धेसाठी जवळपास ३२ लाखाहून अधिक खेळाडुंनी नोंदणी केली होती. राज्यातील ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येत होती. त्यामुळे अनेक तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या संख्येने नोंदणी केली. मुख्यमंत्र्यांच्या नावाने झालेल्या या भव्य आणि व्यापक स्पर्धेने राज्यातील वेगवेगळ्या भागातील तरुणांना एकमेकांशी जोडले गेले.
तरुणांच्या गुणांना वाव देण्यासाठी सरकार सदैव तत्पर
दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात, विभागात, जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी राज्यातील सर्व शहरांमध्ये, तालुकास्तरावर चांगल्या प्रतीच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करण्यावर फडणवीस सरकारने भर दिला. यासाठी विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरांवर क्रीडासंकुले उभी राहावीत यासाठी सढळ हस्ते निधी उपलब्ध करून दिला. क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांच्या नियुक्तीसाठी मान्यता देण्यात आली. विद्यार्थ्यांसोबतच क्रीडा शिक्षकांसाठीसुद्धा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले.
पालकांचाही देवेंद्र फडणवीसांच्या कल्पनेला सलाम
मोबाईल आणि अभासी दुनियेत रमणाऱ्या तरुणाईला सीएम चषक स्पर्धेमुळे प्रत्यक्षात मैदानात उतरून आपली ताकदी आजमावायची संधी मिळाली. या स्पर्धेच्या आयोजनामुळे अनेक पालकांनीही आनंद व्यक्त केला. कारण जी मुले घरात बसून तासन् तास मोबाईलवर खेळत राहायची. त्यांना अभ्यासाचे, जेवणाचे स्वत:च्या शरीराचे असे कशाचेही भान राहिले नव्हते. ती मुले या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात उतरली. आपल्या आवडीचे खेळ खेळली. त्याचा आनंद घेतला. ही गोष्टही थोडीथोडकी नव्हे. कारण या अशाच मुलांच्या पालकांनी देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवरील आभासी खेळ बॅन करण्याची विनंती केली होती. यावर फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधून तरुणाईला वेड लावणाऱ्या आणि त्यांना निष्क्रिय करणाऱ्या ऑनलाईन गेमवर बंदी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर या मुलांना घराच्या बाहेर आणून त्यांचे मन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमावे यासाठी सीएम चषक सारख्या स्पर्धांचे आयोजन केले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेली सीएम चषक ही फक्त एक स्पर्धा नव्हती. तर तो तरुणाईसाठी केला गेलेला एक सर्वांगिण विचार होता. तरुणांनी मैदानात उतरून आपल्या आवडीचे खेळ खेळावे, त्यामध्ये नैपुण्य मिळवावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या खेळामध्ये करिअर करून आपल्या मतदारसंघाचे, विभागाचे, जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नाव मोठे करावे, हा उदात्त हेतु तर यामागे होताच. पण त्याचबरोबर तरुणाईच्या कला-गुणांना वाव देणारा हा विचार होता. जी तरुणाई आभासी खेळांमध्ये रमत होती. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी खऱ्या जगात वावरण्यासाठी, जिंकण्या-हरण्याची संधी देणारा हा विचार होता. त्याचबरोबर ज्या पालकांना आपल्या मुलांची चिंता वाटत होती. त्या पालकांना आश्वस्त करण्याचा देखील हा एक विचार होता. एकूण खेळातून खूप काही शिकण्यासारखे असते. एखादा खेळ हारला तरी चालेल, पण तो खेळ खेळण्यासाठी जी हिंमत एकवटली जाते. ती हिंमत कधीच हरू द्यायची नाही, असा मौलिक संदेश ‘सीएम चषक’ स्पर्धेतून तरुणांना मिळाला. अशाप्रकारे सर्व पातळीवर ‘सीएम चषक’ स्पर्धा तरुणांचा सळसळीत उत्साह टिकवून ठेवणारी, तसेच त्यांच्यातील खेळाडुला जिवंत ठेवणारी स्पर्धा ठरली.
संबंधित विडिओ