Solapur Development Plan : सोलापूरच्या सर्वांगिण विकासासह जिल्हा दुष्काळमुक्त करणार

२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला होता. पण त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट होते. तिथल्या गावांना पिण्याचे पाणी टँकरने उपलब्ध करून द्यावे लागत होते. ही परिस्थिती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराचे पाणी दुष्काळी भागात पोहचवण्यासाठी आणि इथल्या भागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहून जाणारे पाणी सातारा, उस्मानाबाद, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात वाहून नेण्यासाठी या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञांसोबत बैठका केल्या. ज्या पद्धतीने सांगली, कोल्हापूरमधील पुराचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याचपद्धतीने या भागातील पाणी नजीकच्या दुष्काळी तालुक्यात नेण्यासाठी तज्ज्ञांची मते घेण्यात आली. या बैठकीत कृष्णा-भीमा नदी जोड प्रकल्पाच्या कामाचे सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास १५ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तो एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून घेण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता.

Solapur Development Plan

सोलापूर विकास योजना | Solapur Development Plan in Marathi

टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी पाण्याची सोय

२०१९ च्या दुष्काळी परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय काढून सोलापूरमधील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, करमाळा,माढा, माळशिरस या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करून, तिथल्या गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर विंधन विहीरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, दुष्काळाच्या स्थितीचा धैर्याने सामना करण्यासाठी आणि ग्रामस्थांना मदत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून दुष्काळी भागातील सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून लगेच उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांवर ४८ तासांत कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

सोलापूर विद्यापीठाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ५ मार्च २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सरकारने अध्यादेश जारी केला आणि ६ मार्च रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा सोहळा झाला. त्यानंतर २४ जून रोजी पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडून ते मंजूर करण्यात आले.

सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र

तरुण पिढीला महात्मा बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान आणि त्यांची प्रासंगिकता याची माहिती मिळावी, यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भारतातील जात इतिहास, सामाजिक-सांस्कृतिक समता, धर्म आणि समाज, नव्या सामाजिक चळवळी आणि संस्कृती याविषयी या अध्यासन केंद्रात संशोधन केले जाणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

पुणे ते पंढरपूर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प

चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाणी येऊ नये यासाठी ‘नमामी चंद्रभागा’ उपक्रमाच्या माध्यमातून सांडपाणी एकात्मिक प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी ५९.७५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत केली होती. चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या १२० गावात शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेतली. तसेच या गावांमधून जमा होणारे सांडपाणी हे यापुढे प्रक्रिया करून चंद्रभागा नदीत सोडण्याची प्रक्रिया अवलंबवली गेली.

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग

राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून त्याचा २०१८-१९ च्या नियोजनामध्ये त्याचा समावेश केला आहे. या रेल्वे मार्गामुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. शिवाय तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भेट देणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, या ८० किमीच्या मार्गासाठी ९५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील ५० टक्के खर्च हा राज्य सरकार आणि ५० टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

मुंबई ते सोलापूर या दरम्यानच्या जलद प्रवासासाठी सरकारने इथल्या प्रवाशांसाठी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू केली. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला. ही देशातील नववी वंदे भारत ट्रेन असून ती १०० ते १२० किमी या वेगाने धावणार आहे. या एक्सप्रेसमुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर तसेच पुण्याजवळील आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांशी असलेली कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.

असंघटित कामगारांसाठी राज्यातील सर्वांत मोठा गृहप्रकल्प

सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३० हजार घरकुल प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण १९ जानेवारी २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणारा राज्यातील हा सर्वांत मोठा गृहप्रकल्प आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ९ जानेवारी २०१९ रोजी केले होते. इथे एकूण ८३३ इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी एकूण १८११.३३ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा हिस्सा वितरित केला असून, याच्या पहिल्या टप्प्याचे नुकतेच पंतप्रधानांनी उद्घाटन केले. या प्रकल्पांतर्गत असंघटित क्षेत्रातील विणकर कामगार, वाहक, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, घरगुती कामगार, मोटार गॅरेज कामगार, फळे-फुले विक्रेते, दुरुस्तीची कामे करणारे कारागीर यांना घरे दिली जाणार आहेत.

सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त राज्यात श्री अन्न अभियान राबवण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. या अभियानासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून, सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतची घोषणाही केली होती. दरम्यानच्या काळात हे केंद्र बारामतीला स्थलांतरित करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू होत्या. पण शेवटी ते सोलापूर येथेच करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सोलापूरमधील विविध विकासाकामांचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करण्यात आली. तसेच सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन, खेळाचे मैदान, नवीन बस स्थानकाचे, एक्झिबिशन सेंटर, मंडईचे पुनर्निमाण आणि महापालिकेच्या इमारतीचे नूतनीकरण, तसेच अक्कलकोटमधील नवीन बस स्थानकाचे आणि श्री मल्लिकार्जून मंदिराची पायाभरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Solapur Development Plan संबंधित विडिओ

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *