Maharashtra FDI 2024-25: देशातील एकूण गुंतवणुकीपैकी निम्म्याहून अधिक परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

मागील दोन वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२४) सुद्धा सर्वाधिक ७० हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आणून महाराष्ट्राला पुन्हा एकदा क्रमांक एकचे राज्य बनवले.

महाराष्ट्रात येणारे मोठमोठे उद्योगधंदे हे गुजरात किंवा भाजपची सत्ता असलेल्या इतर राज्यांमध्ये वळवले जात आहेत. असा चुकीचा आणि खोटा नेरेटीव्ह राज्यातील विरोधी पक्षाकडून सातत्याने पसरवला जात आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. पण हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकत्याच केंद्र सरकारच्या डीपीआयटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत परकीय गुंतवणुकीत आपला पहिला क्रमांक राखला आहे. या कालावधीत देशात एकूण १ लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली. यापैकी ७० हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली. देशातील एकूण एफडीआय गुंतवणुकीपैकी ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

Maharashtra FDI Inflow Details

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून सर्वसामान्यांची दिशाभूल केली जात आहे. राज्यातले उद्योग गुजरात व इतर राज्यांमध्ये पाठवले जात आहेत. या विरोधाला गुंतवणुकीच्या आकड्यांनी चोख उत्तर दिले. महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा परकीय गुंतवणुकीत टॉप टेनमध्ये नंबर लागतो. पण या ९ राज्यांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीची एकत्रित बेरीज केली तरी ती एकट्या महाराष्ट्रात झालेल्या गुंतवणुकीपेक्षा कमी असल्याचे दिसून येते.

सातत्याने परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अव्वल राहिलेल्या महाराष्ट्राने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आणली आहे. एप्रिल ते जून २०२४ या तीन महाराष्ट्रात एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक राज्यात (१९,०५९ कोटी), तिसर्‍या क्रमांकावरील दिल्लीत (१०,७८८ कोटी), चौथ्या क्रमांकावरील तेलंगणामध्ये (९०२३ कोटी),पाचव्या क्रमांकावरील गुजरातमध्ये (८५०८ कोटी), 

सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडूमध्ये (८३२५ कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणात (५८१८ कोटी), आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेशमध्ये (३७० कोटी) आणि नवव्या क्रमांकावरील राजस्थानमध्ये (३११ कोटी) रुपयांची परकीय गुंतवणूक झाली.

यापूर्वी २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक (Maharashtra FDI Inflow)झाली होती. ही गुंतवणमूक कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या राज्यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती. त्याचप्रमाणे २०२३-२४ या आर्थिक वर्षात १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली होती. ही गुंतवणूक गुजरातपेक्षा दुप्पट होती आणि गुजरात व कर्नाटक या राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या बेरजेहून जास्त होती. यावरून महाराष्ट्राचे परकीय गुंतवणुकीतील स्थान लक्षात येते. २०१४ ते २०१९ या कालावधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण ३ लाख ६२ हजार १६१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. आताही २०२२ मध्ये सत्तेत आल्यानंतर देवेंद्रजींनी अडीच वर्षांत ५ वर्षांचे काम करुन दाखवू,असे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. त्यानुसार या सव्वा दोन वर्षांत महायुती सरकारने ३ लाख १४ हजार ३१८ कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात  आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *