मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास होत आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि गतिमान निर्णयक्षमतेमुळे राज्याच्या विविध भागात आधुनिक वाहतूक साधनांची उपलब्धता वाढत आहे. विशेषतः विदर्भातील नागपूरसारख्या शहरामध्ये पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांना नवे बळ मिळत आहे. नागपूरमध्ये मेट्रोचाही विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात आणखी एका साधनसुविधेची भर पडली आहे; ती म्हणजे नागपूर (अजनी) – पुणे वंदे भारत एक्सप्रेसची.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. १० ऑगस्ट, २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने नागपूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला. तर इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर स्टेशनमध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. नागपूर – पुणे वंदे भारत सेवा ही सुमारे ८८१ किलोमीटरचे अंतर कापणार आहे. यामुळे प्रवाशांचे जवळपास ५ तास वाचणार आहेत. पूर्वी या मार्गावर प्रवाशांना १७ तास लागत होते. ते आता १२ तासांत आपला प्रवास पूर्ण करू शकणार आहेत. या गाडीचा वेग सरासरी ७३ किमी प्रतितास असून, ती खालील प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
- वर्धा
- बडनेरा
- अकोला
- भुसावळ
- जळगाव
- मनमाड
- कोपरगाव
- अहिल्यानगर
- दौंड
देशातील सर्वांत लांब अंतर पार करणारी वंदे भारत
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही देशातील सर्वात लांब अंतर पार करणारी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा फक्त प्रवासाचा वेळच वाचत नाही, तर प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधाही मिळत आहे. या गाडीत चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअरचा पर्याय उपलब्ध असून, तिकिटामध्येच भोजन सुविधेचा समावेश आहे. यामुळे प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होत आहे. विदर्भातील लोकांना पूर्वी नागपूर ते पुणे हा प्रवास फक्त खासगी वाहने किंवा महागड्या बसेसच्या माध्यमातूनच शक्य होता. सामान्य नागरिकांना यासाठी खूप पैसे खर्च करावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे नागपूर – पुणे ही सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत ही गाडी प्रत्यक्षात सुरू केली.
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नागपूरसारख्या शहरातून पुण्यासारख्या औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्राला जोडणाऱ्या या सेवेने फक्त प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार नाहिये. तर त्याचबरोबरीने रोजगार, पर्यटन आणि व्यापाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत. ही ट्रेन पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांना जलद गतीने जोडणार आहे. त्यामुळे या भागांतील पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या सेवेत इतक्या वंदे भारत ट्रेन धावतायेत!
देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळणाच्या सुविधांचे नियोजन केले आहे. त्यांनी नगर-दौंड मार्गाऐवजी थेट नगर-पुणे रेल्वेमार्गाच्या उभारणीची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून प्रवाशांचा अजून वेळ आणि अंतर वाचेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे या औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी रेल्वे आणि महामार्ग अशी दोन्ही साधने आवश्यक आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गासाठीचा प्रस्ताव हा ‘राईट ऑफ वे’ डायरेक्शनमध्ये आहे. आजच्या घडीला नागपूर – सिकंदराबाद, नागपूर – इंदूर, बिलासपूर – नागपूर आणि आता नागपूर – पुणे अशा एकूण चार वंदे भारत गाड्या विदर्भातून सुरू आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात १२ वंदे भारत ट्रेन सुरु असून त्या देशाच्या विविध भागाला महाराष्ट्राशी जोडत आहेत. अशी सेवा निर्माण करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा दूर दृष्टिकोन दिसून येतो.
‘इन्फ्रा मॅन’ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त रस्ते, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांचे नेतृत्व करत नाहीत. तर त्यामागे असलेली सामाजिक आणि आर्थिक दिशा देखील अधोरेखित करत आहेत. विदर्भातील नागपूरसारख्या शहरांमधून सुरू झालेला प्रगतीचा प्रवास, त्यांच्या दृढ इच्छाशक्तीचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे मूर्त स्वरूप आहे. वंदे भारतसारखे प्रकल्प हे या प्रगतीचे एक उदाहरण आहे.
संबंधित लेख: