Taiwan Expo 2023, a highly anticipated annual trade expo, will be held in India for the first time from October 5 – 7, 2023, at the NESCO Exhibition Centre in Goregaon, Mumbai.
आपल्या सर्वांना ठाऊक आहे की तैवान दरवर्षी दिल्लीत ‘तैवान-एक्स्पो’ (Taiwan Expo ) नावाने आपल्या देशातील उद्योगांची प्रदर्शनी भरवतो. तैवान हा देश आपले इन्होवेशन आणि तंत्रज्ञानासाठी जगविख्यात आहे. जिओ पॉलिटिक्स बघायला गेलो तर चीन तैवानला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे आणि भारत तैवानचा जुना मित्र आहे. त्यामुळे भारत आणि तैवानमध्ये वाणिज्य-व्यापार फुलण्याने चीनला चांगल्याच मिरच्या झोंबणार यात शंकाच नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi) २०१४ साली पंतप्रधान बनल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात अभूतपूर्व परिवर्तन झाले. मोदीजींनी बड्या राष्ट्रांच्या अधिपत्यासमोर झुकण्याऐवजी छोट्या-छोट्या देशांशी संबंध वृद्धिंगत करत अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताला एक स्वतंत्र नेतृत्व म्हणून उभे केले. त्यातूनच तैवानने सुद्धा भारतात आपल्या उद्योगांचा विस्तार केला. त्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही भारतात होणाऱ्या तैवान एक्स्पोचे विशेष महत्व आहे.
२०२३ चा Taiwan Expo हा महाराष्ट्रासाठी एक फार मोठी पर्वणी ठरणार आहे आणि याचे संपूर्ण श्रेय जाते ते राज्याचे मुत्सद्दी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना. कारण दरवर्षी दिल्लीत होणारा तैवान एक्स्पो देवेंद्रजींनी मुंबईत खेचून आणला. २०१८, २०१९ सलग दोन वर्षं दिल्लीत आयोजित केला जाणारा Taiwan Expo 2023 यंदा प्रथमच दिल्लीबाहेर म्हणजे मुंबई, महाराष्ट्रात होतो आहे. ३० जून २०२२ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी स्वतंत्र परराष्ट्र नीति अवलंबली. त्यामुळे आज महाराष्ट्र हे देशातील कदाचित पहिलेच राज्य असावे जिथे राज्य सरकार थेट परराष्ट्रातील सरकार आणि कंपन्यांशी व्यावसायिक भागीदारी करते आहे. देवेंद्रजींच्या मॉरिशस आणि जपान दौऱ्यादरम्यानही जगभरात भारतासोबतच महाराष्ट्राबद्दलही गुंतवणूकदारांना आकर्षण वाटतं आणि देवेंद्रजी ते अचूक हेरून महाराष्ट्रात मेगा गुंतवणूक आणताहेत. त्याचीच फलश्रुती म्हणजे वसुली आघाडीच्या काळात पिछाडीवरचा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अवघ्या एका वर्षात परकीय गुंतवणुकीत पुन्हा नंबर-१ वर आला आहे.
Taiwan Expo 2023 मध्ये उत्पादन, स्मार्ट सिटी निर्माण, वैद्यकीय उपकरणे निर्मिती, लाईफस्टाईल, कृषी उत्पादने व इलेक्ट्रिक वेहिकल्स अशा विविध क्षेत्रातील तब्बल ९० कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. याचा भारतीय सूक्ष्म व लघु उद्योजकांना आपला व्यवसाय विस्तार करण्यास आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यात मोठा फायदा होणार आहे. देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत देवेंद्र फडणवीसांचे सत्तेत पुनरागमन झाल्यापासून गुंतवणुकीचा धो-धो पाऊस पडतो आहे. कारण आता महाराष्ट्रात स्थिर आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे. त्यामुळे तैवान एक्स्पोचा महाराष्ट्रातील उद्योजकांना तर फायदा होणारच आहे. परंतु त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे चीनची आर्थिक आणि राजकीय कोंडी होणार आहे. कोविड महामारीनंतर चीन संपूर्ण जगासाठी खलनायक बनला असून अनेक अमेरिकन, युरोपीय कंपन्या चीनमधून आपली गुंतवणूक काढून भारताकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे भारताच्या प्रगतीवर जळून चीन सीमेवर सतत काहीतरी कागाळ्या करत असतो. भारतीय नेते, पत्रकारांना रसद पुरवून भारतात अराजकता माजविण्यासाठी कारस्थान रचत असतो. टेस्ला आणि ऍप्पलसारख्या कंपन्यांनीही आता आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. त्यामुळे चीन फारच चरफडतो आहे. अशातच मुंबईत तैवान एक्स्पोच्या होणाऱ्या भव्य आयोजनामुळे चिनी ड्रॅगनचे शेपूट चांगलेच चेचले गेले आहे. कारण चीन तैवानवर आपला हक्क सांगतो आणि तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. त्यामुळे तैवान एक्स्पो मुंबईत खेचून आणत देवेंद्रजींनी थेट चीनच्याच मुस्काटात हाणली आहे. राक्षसी महत्वाकांक्षा असलेला विस्तारवादी चीन व आतंकवादाचा अड्डा असलेल्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोदीजींनी सुरु केलेल्या लढ्यात महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात मोदीजींना भक्कम साथ देतो आहे, ही बाब प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.
देवेंद्र फडणवीस-२.० (Devendra Fadnavis) म्हणजेच उपमुख्यमंत्री म्हणून परतलेल्या देवेंद्रजींनी व्यक्तिगत महत्वाकांक्षांना न चुचकारता महाराष्ट्राच्या प्रगतीवरच आपले संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वर्षभरातील दौरे आणि निर्णयांचा धडाका पाहता, महाराष्ट्र २०२८ पूर्वीच १ ट्रिलयन डॉलर इकोनॉमीचे ध्येय सहज साध्य करेल. परंतु त्यासाठी गरज पडेल ती फक्त महाराष्ट्राने नरेंद्र-देवेंद्र या जोडगोळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची!