Green Hydrogen Plant in Maharashtra : राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत आहे. शेतीसाठी विजेची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पारंपरिक वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात कोळशाला पर्याय म्हणून इतर मार्गांचा अवलंब करायचे धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे. यासाठी हरित हायड्रोजन निर्मितीचा मार्ग शासनाने अवलंबला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने हरित हायड्रोजनच्या निर्मितीसाठी राज्यात सात प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमधून राज्यातील ६४ हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे देशातील अग्रेसर अशा विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या सात प्रकल्पांतर्गत २ लाख ७६ हजार ३०० कोटी रुपये इतकी आर्थिक गुंतवणूक करण्यात येणार आहे.
हरित हायड्रोजन प्रकल्प हे तंत्रज्ञान पर्यावरणाचा समतोल राखून चांगली ऊर्जा तयार करु शकते. तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून या माध्यमातून महाराष्ट्र एक नवे उदाहरण तयार करेल. हरित हायड्रोजनसाठी धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हरित हायड्रोजन प्रकल्पाला देशातील 7 आघाडीच्या कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रात हरित हायड्रोजन प्रकल्पाला देशातील नामांकित अशा एनटीपीसी ग्रीन एनर्जी,अवादा ग्रीन हायड्रोजन, रिन्यु ई-फ्युअल्स,आयनॉक्स एअर प्रॉडक्टस्, एल.एन.टी. ग्रीन टेक, जे. एस. डब्ल्यू ग्रीन हायड्रोजन,वेलस्पन गोदावरी जीएच २ या सात कंपन्याचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा हा महाराष्ट्राचे हित साधणारा – Green Hydrogen Investment
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जपान दौरे हे महाराष्ट्राचे हित साधणारा ठरत आहेत. जपान ने देवेंद्रजी ना स्टेट गेस्ट म्हणून निमंत्रण दिले होते. देवेन्द्रजींचा 5 दिवसीय जपान दौरा हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. जपानच्या दौऱ्यात मुंबईत होणाऱ्या विविध म्हत्त्वाकांक्षी प्रकल्पांना जपान सरकारने अर्थसाहाय्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वर्सोवा-विरार सी लिंक, मुंबईत सतत येणारा पुर रोखणे, मेट्रो 11 प्रकल्प आदी मुद्द्यांवर यशस्वी चर्चा करण्यात आली. जायका व जेट्रो सारख्या कंपन्यांशी झालेली चर्चा गुंतवणुकीत बदलत आहे. एनएनटीटीने गुंतवणूक दुप्पट करण्याची तयारी दर्शवल्यामुळे मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. सन 2014 साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जपान सोबत मैत्रीपूर्ण सबंध प्रस्थापित केल्यामुळेच महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळाली.
मेट्रो 11 सीएसएमटी ते वडाळा मेट्रोचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठीही मदत मिळणार आहे. याशिवाय पावसाळ्यात मुंबईतील पूर निवारणासाठी, वर्सोवा ते विरार सी लिंकसाठी आणि मेट्रो 3 चे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी जायका कंपनीच्या गुंतवणुकीचा 4 था व 5 हफ्ता लवकरच मिळणार आहे. मेट्रोच्या उभारणीत सुमिटोमोची गुंतवणूक जपानी कंपन्या करणार आहेत.
या शिवाय पुण्याला स्टार्ट अप हब म्हणून विकसित करण्यासाठीही जपान मदत करणार आहे. अर्थात यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. सेमी कंडक्टर चीप्स चा कारखाना महाराष्ट्रात उभारण्यसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानच्या दौऱ्यात प्रयत्न केले आहेत. वाकायामा कंपनीचे गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ लवकरच राज्यात भेट देणार आहे. त्यासोबत मराठी विद्यार्थ्यांना बौद्धधर्म अभ्यास व संशोधनासाठी जपान सरकार मदत करणार आहे. एनटीटी डेटा कंपनीने महाराष्ट्रात आपली गुंतवणूक दुप्पट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुणे आणि नागपूर शहरातील बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी लवकरच उपलब्ध होणार आहेत.