महाराष्ट्रात २ ऑक्टोबर २०१५ पासून सेवा हमी कायदा लागू झाला. या कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्रजींनी राज्य सेवा हमी कायद्याला मंजुरी दिली होती. या कायद्यांतर्गत सर्वसामान्यांना आपले सरकार वेबपोर्टलच्या माध्यमातून जवळपास ३८ विभागातील ४८५ सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री या दोन नेत्यांच्या जयंती दिनापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना सेवा हमी कायद्यांतर्गत विशेषाधिकार मिळवून दिला. आपले सरकार या वेबपोर्टलच्या माध्यमातून सेवा हमी कायद्यातील ऑनलाईन सेवांचा लोकार्पणाचा सोहळा २ ऑक्टोबर रोजी पार पडला. प्रशासनाची विश्वासार्हता अधिक वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर देवेंद्रजींनी भर दिला. त्याचाच भाग म्हणजे हे आपले सरकार वेबपोर्टल आहे. या पोर्टलमधून सामान्य नागरिकांना मुदतीत सेवा देण्याचा संकल्प सोडला होता. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत राज्याची व्यवस्था पोहोचवण्यासाठी आपले सरकार वेबपोर्टलचा मोठा उपयोग झाला.
एकत्रित सेवा देणारा डिजिटल प्लॅटफॉर्म – Aaple Sarkar Portal information in marathi
२०१५ मध्ये जेव्हा सेवा हमी कायदा पारित करण्यात आला. त्यावेळा या कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी २२४ सेवा अधिसूचित करण्यात आल्या होत्या. त्या सेवांची संख्या आता ७७० पर्यंत पोहोचली आहे. त्यातील जवळपास ३८ विभागांच्या ४८५ सेवा वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना या सेवा घरबसल्या मिळवता येत आहेत. २०१५ पासून सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत एकूण १७ कोटी ६३ लाख ६२ हजार ४६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १६ कोटी ६१ लाख ३ हजार ९०९ अर्ज निकाली काढण्यात आले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ कोटी ६६ लाख २३ हजार २७५ अर्ज आले होते. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत त्यातील १ कोटी ४९ लाख ९३ हजार ८८८ अर्ज निकाली काढण्यात आले.
जनसेवेच्या दृष्टिने महत्त्वाकांक्षी उपक्रम
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक ‘आपले सरकार’ उपक्रम. आपले सरकार या वेबपोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक पारदर्शक, सुलभ आणि गतिमान बनवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत डिजिटल युगात सरकारने नागरिकांशी थेट संपर्क साधावा, त्यांच्या तक्रारींचे लगेच निवारण व्हावे. त्याचबरोबर विविध सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिने आपले सरकार पोर्टल विकसित करण्यात आले. आपले सरकार पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट ई-गव्हर्नन्स हे आहे. यामुळे प्रशासनाच्या कामातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली. नागरिकांना सरकारी सेवा सुलभपणे मिळू लागल्या. त्यांच्या तक्रारींचे लगेच निवारण होऊ लागले. डिजिटल सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करून ती शेवटच्या घटकापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली.
सरकारच्या विविध सेवांची उपलब्धता हे आपले सरकार वेबपोर्टलचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या पोर्टलवर नागरिकांना सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील सरकारी सेवांचा लाभ मिळत आहे. जसे की, वेगवेगळ्या प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने यांचे अर्ज सादर करणे, आदी सेवांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात आता जावे लागत नाही. त्याचा अर्ज ऑनलाईन करता येतो. सध्या या पोर्टलवर जवळपास ४५० हून अधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण हा सुद्धा या पोर्टलचा महत्त्वाचा उद्देश आहे. विविध समस्यांचा जलदगतीने ऑनलाईन निपटारा व्हावा. यासाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली. इथे नागरिक त्यांच्या तक्रारी थेट नोंदवू शकतात. तसेच त्यांचे स्टेटस ट्रॅक करू शकतात. या सुविधांबरोबरच आपले पोर्टलवर माहिती अधिकार (Right to Information) अर्ज ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा देण्यात आली. यामुळे नागरिकांना सार्वजनिक माहिती मिळवणे अधिक सोपे झाले.
सेवांचे डिजिटायझेशन
आपले सरकार पोर्टलवर सेवा वितरित करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटायझ करण्यात आली आहे. ज्यामुळे कागदपत्रांवरील अवलंबित्व कमी झाले असून कामे जलदगतीने पूर्ण होऊ लागली आहेत. कागदी कामकाजामुळे होणारा विलंब टाळून नागरिकांना त्वरित सेवा उपलब्ध करून देण्यात मदत झाली. इथे एखाद्या सेवेसाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची स्थिती किंवा प्रगती पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या अर्जाचा नक्की कोणत्या टप्प्यावर विचार चालू आहे, हे समजण्यास मदत होत आहे. हे पोर्टल मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे ग्रामीण, नागरी आणि समाजातील सर्व प्रकारच्या नागरिकांना याचा वापर करता येत आहे.
आपले सरकार हे वेबपोर्टल महाराष्ट्रातील ई-गव्हर्नन्सने प्रगतीच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरले आहे. यामुळे सरकार आणि नागरिकांमधील अंतर कमी झाले. नागरिकांना आपल्या समस्यांचे त्वरित समाधान मिळत आहे. सेवांचा लाभ मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत नाही. तसेच यामुळे प्रशासनातील विलंब, भ्रष्टाचार, आणि लाल फितीच्या कारभाराचा अंत होण्यास मदत झाली.
आपले सरकार वेबपोर्टल हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने ई-गव्हर्नन्सच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. यामुळे सरकार आणि नागरिकांमधील संवाद सुलभ झाला. तक्रार निवारणाची प्रक्रिया जलद झाली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सरकारी सेवांमध्ये पारदर्शकता आली. याचा चांगला परिणाम महाराष्ट्राच्या विकासप्रक्रियेत दिसून येत आहे.
३० लाख लोकांना आपले सरकार पोर्टलचा फायदा
आपले सरकार पोर्टल – तक्रार निवारण केंद्र
गोंदियातील शेतकऱ्याला आपले सरकार पोर्टलवरून तात्काळ मदत
सरकार आपल्या दारी
आपले सरकारवर ऑनलाईन सेवा
आपले सरकार पोर्टलद्वारे सुटल्या जनतेच्या तक्रारी
आपले सरकार चॅटबॉट सुविधेचे उद्घाटन
आपले सरकार पोर्टलवर राईट टू सर्व्हिस सेवेचा शुभारंभ
माय गव्हर्नमेंट साईटवर आपले सरकारचा शुभारंभ
…………………………………………………………………..