Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana : पीक न घेताही शेतकऱ्याला मिळणारी हेक्टरी १.२५ लाख रुपये

आज महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. कारण ‘Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana-2.0′ च्या ९,००० मेगावॅटची कामे आज राज्याचे उर्जावान ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं ऍवार्ड केले. विशेष म्हणजे स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत देशातील सर्वच नामांकित ऊर्जानिर्मिती कंपन्यांनी सहभाग घेतला. या Solar grid प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा पूर्णवेळ आणि स्वस्त वीज तर मिळणार आहेच परंतु उत्पन्नाचे नवे साधनही मिळणार आहे. ४०,००० कोटींच्या गुंतवणुकीतून ९,००० मेगावॅटची कामे केली जाणार असून त्यातून २५,००० रोजगार निर्मिती होणार आहे आणि २०२५ पर्यंत ४०% महाराष्ट्र कृषी फिडरवर येणार आहे. एवढेच नव्हे तर या प्रकल्पासाठी आपली पडीक शेतजमीन सरकारला भाडे तत्वावर देणाऱ्या शेतकऱ्यांना १.२५ लाख प्रति हेक्टर वार्षिक भाडे सुद्धा मिळणार आहे. म्हणजे पूर्णवेळ स्वस्त वीज आणि पडीक जमिनीचे बक्कळ भाडे, असा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana
Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

आघाडी सरकारच्या काळात 2013 पर्यंत महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याची घोषणा हवेतच विरली आणि महाराष्ट्राने 16-16 तास भारनियमन सोसले. 2014 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री बनले आणि महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी ऊर्जा विभागात अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. अपुऱ्या वीजेमुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री जीव मुठीत घेऊन ओलितासाठी शेतात जावे लागायचे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा पूर्णवेळ वीज मिळावी ही मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. त्यामुळे देवेंद्रजींनी 2016 मध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ जाहीर करत, शेतीसाठी लागणारी वीज ही सोलर ग्रीडच्या माध्यमातून निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अण्णा हजारे यांचे वास्तव्य असलेल्या राळेगण सिद्धी येथे पहिला पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. 2014-2019 या काळात Solar Grid ची क्षमता सुमारे 2,000 मेगावॅट इतकी होती. ठाकरे सरकारच्या काळात ही योजना राजकीय इच्छाशक्ती अभावी बारगळली. परंतु 2022 मध्ये देवेंद्रजी सत्तेत परतताच त्यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. आज याच दुसऱ्या टप्प्यात 9,000 मेगावॅटच्या कामांचे टेंडर वाटपाचे काम पूर्ण झाले.

देवेंद्रजींनी सत्तेत वापसी केल्यानंतर जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी (Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana) या आपल्या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रकल्पांना विद्युतगती दिली. दुसरीकडे ज्या भागात जो क्रॉप पॅटर्न आहे, त्या भागाला अनुरूप शेतमाल प्रक्रिया उद्योग निर्मितीला सुरुवात केली. एकीकडे कोकणात काजू महामंडळाची स्थापना केली तर दुसरीकडे विदर्भ-मराठवाड्यासाठी टेक्स्टाईल व संत्रा प्रक्रिया उद्योग आणले. त्यामुळे मुबलक पाणी, अखंडित वीज व सप्लाय चेनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी आत्मनिर्भर बनेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबेल, यासाठीच महाराष्ट्रसेवक देवेंद्रजी 2014 पासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *