धनश्री मुजमुलेच्या संकटात धावून आलेले ‘देवदूत’ देवेंद्रजी! |CM Relief Fund Beneficiary Dhanashree Mujmule

राज्यात कुठेही आणि कुणावरही कसलेही संकट आले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवदूत बनून धावून येतात. अशाच एका चिमुकलीसाठी देवेंद्रजी देवदूत ठरले होते. २२ जून २०१८ मध्ये जालन्यातील धनश्री मुजमूलेचे निःशुल्क हार्ट ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन झाले होते. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून झालेल्या मदतीमुळे धनश्रीला जीवनदान मिळाले होते. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या ८ वर्षांच्या धनश्रीला डाइलेटेड कार्डियोमायोपैथी हा गंभीर आजार होता. हृदय प्रत्यारोपण केल्याशिवाय तिचे प्राण वाचणार नव्हते. या दुर्धर आजारावरील उपचारासाठी २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. पण मुजमुले कुटुंबाला एवढी रक्कम जमवणे अशक्य होते. कशीतरी मदत होईल या आशेवर धनश्रीच्या आगतिक बापाने अनेक उंबरठे झिजवले. मात्र, मदत मिळाली नाही. अनेक सामाजिक संस्थांमधून लेकीच्या ऑपरेशनसाठी नकारघंटा येत होती. तेव्हा हताश झालेल्या धनश्रीच्या वडिलांनी एक शेवटची आशा म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाशी संपर्क केला. तेथे त्यांना प्रतिसाद मिळाला आणि धनश्रीच्या उपचारासाठी देवेंद्रजी देवदूत बनून आले. 

धनश्री मुजमुले ही तिच्या कुटुंबासोबत जालना येथे वास्तव्यास होती. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. २०१७ मध्ये धनश्री अचानक आजारी पडल्यामुळे तिच्या कुटुंबाने तिला जालना येथील रुग्णालयात दाखल नेले. पण तिथे धनश्रीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. किंबहुना धनश्रीची प्रकृती खालावत गेली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा जालन्यातील डॉक्टरांनी धनश्रीला मुंबईला न्या, असा सल्ला दिला. तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे तिची हृदयरोग तज्ज्ञाकडून तपासणी केली असता, तिच्या हृदयाचा आकार हा सर्वसामान्यांपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून आले. तसेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याही पुरेशा ताकदीने काम करत नव्हत्या. तिला डाइलेटेड कार्डियोमायोपैथी हा गंभीर आजार झाला होता. तिला या आजारातून वाचवण्यासाठी लवकरात लवकर तिचे हृदय प्रत्यारोपण करावे लागणार होते. हे ऐकताच मुजमुले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण संपूर्ण कुटुंबाने धीर एकवटून तिची औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये तिला हृदय हवे आहे, अशी नोंदणी केली.

२०१८ पर्यंत धनश्रीवर औषधोपचार करण्यात आले. पण तिच्या आरोग्यात विशेष सुधारणा होत नव्हती. एकीकडे हृदय डोनर शोधण्याचा तणाव तर दुसरीकडे औषधोपचारांचा खर्च होता. दरम्यान, २१ जून २०१८ मध्ये औरंगाबाद येथील एका युवकाचे अपघातामुळे ब्रेनडेड झाले होते. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे हृदय, किडनी, लिव्हर आणि डोळे दान करण्याचा निर्णय एमजीएमच्या व्यवस्थापनाला कळविला होता. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी प्रतिक्षा यादीतील धनश्रीच्या वडिलांशी संपर्क साधून, प्रत्यारोपणासाठी हृदय उपलब्ध झाल्याचे सांगितले. हृदय मिळाल्याने मुजमुले कुटुंबाला दिलासा मिळाला होता. पण ही शस्त्रक्रिया अंत्यत खर्चिक असल्याने यासाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न त्यांना पडला होता. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संपर्क साधला. या कक्षातून धनश्रीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी २५ लाखांची मदत करण्यात आली. धनश्रीचे ऑपरेशन मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले. पण औरंगाबादवरून मुंबई हृदय आणणार कसे? हा मोठा प्रश्न होता.

ग्रीन कॉरिडॉरमुळे हृदय दीड तासांत पोहोचले…

औरंगाबाद ते मुंबई हा तसा ८ प्रवास तो दीड तासात पूर्ण करणे कठीण होते. पण म्हणतात ना ज्यांच्या पाठीशी देवाभाऊ त्यांना घाबरण्याची गरज काय. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. रुग्णालय प्रशासन, मुंबई पोलीस, ट्राफिक पोलीस यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही कामगिरी फत्ते झाली. अवघ्या दीड तासात ‘ग्रीन कॉरिडॉर’ने हृदय औरंगाबादमधून मुंबईला पाठविण्यात आले. औरंगाबाद रुग्णालय ते विमानतळ आणि मुंबईतील सांताक्रूझ विमानतळ ते मुलुंडचे फोर्टीस हॉस्पिटल, असा एक ग्रीन कॉरिडॉर पोलिसांद्वारे क्षणार्धात तयार करण्यात आला. औरंगाबाद येथून आणलेले हृदय मुंबईच्या फोर्टीस रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मुंबईत, पोलीस कर्मचाऱ्यांनी विमानतळ आणि फोर्टीस दरम्यानचे १५ सिग्नल मोकळे केले. यामुळे मुंबई विमानतळ ते मुलुंड हे वीस किलोमीटरचे अंतर अवघ्या १८ मिनिटांत पार केले. अशाप्रकारे देवेंद्रजींनी एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी आणि अवयवदान करणाऱ्या त्या कुटुंबांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1682807495864229888

धनश्रीवर हार्टट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जीवन मरणाशी संघर्ष करीत असलेले आपले लेकरू सुखरूप असल्याचे पाहून तिच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. देवेंद्रजींनी समाजाप्रति स्वीकारलेल्या जबाबदारीतून हे शक्य झाले. या  संकटकाळात देवदूतासारखे धावून आलेल्या देवेंद्रजींचे मुजमूले कुटुंबानी आभार मानले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षामुळे मुजमुले कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली. त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्रजींनी धनश्रीच्या हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॅार निर्माण केला. पोलीस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडित व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतिमान केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरला अनेकांचा आधार

मुजमुले कुटुंबासारख्या समाजातील अनेक गोरगरीब निराधार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना गंभीर आणि महागड्या आरोग्यउपचारांवर खर्च करणे अवघड जाते. यामुळे अनेकांना आपले नाहक जीव गमवावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि सर्वसामान्यांना गंभीर आजारांवर महागड्या शस्त्रक्रिया करता येऊ शकतील यासाठी देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला. या कक्षाद्वारे राज्यातील गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळत आहे. देवेंद्रजींनी सुरू केलेल्या या कक्षाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, २०१५ ते २०१९ या काळात १५ लाख रुग्णांना ८४२ कोटींचे वैद्यकीय उपचार मिळाले. त्याचबरोबर मागील अडीच वर्षापासून ४० हजारापेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण ३२१ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *