एक ६५ वर्षांचा अपघातग्रस्त इसम आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवला | Devendra Fadnavis Nagpur News
महाराष्ट्रात कोरोना महामारीचे आलेले संकट असो, वसुली आघाडीचे कुशासन असो, नैसर्गिक आपदा असो किंवा राज्यात कुठेही आणि कुणावरही कसलेही संकट आले तरी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस हे हनुमंताप्रमाणे संकटमोचक बनून धावून येतात. विदर्भातील अतिवृष्टी असो, पश्चिम महाराष्ट्रातील महापूर असो, कोकणातील चक्रीवादळ असो किंवा मुंबईतील चर्नी रोड येथील फुटब्रिजवर झालेली चेंगराचेंगरी असो. देवेंद्रजी तात्काळ थेट मैदानात उतरून आपत्ती व्यवस्थापनात उतरतात आणि परिस्थिती नियंत्रणात आणतात. अर्थात देवेंद्रजींनी बर्लिन येथून डिझास्टर मॅनेजमेंटचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाही केला आहे, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात ते महारथी आहेतच. परंतु त्याही पलीकडे देवेंद्रजी एक अत्यंत संवेदनशील नेते आहेत. त्यामुळेच ते दुसऱ्याचं दुःख स्वतःच्या अंगावर घेऊन संकटमोचकाची भूमिका बजावतात.
अशाच या मोदींच्या हनुमंताच्या संकटमोचनाची रामनवमीच्या दिवशी नागपूरकरांना पुन्हा अनुभूती आली. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्यात भाजपचे स्टार प्रचारक असलेल्या देवेंद्रजींच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. राज्यभरात सुमारे १२५ सभा घेणारे देवेंद्रजी संध्या प्रचार कार्यात अत्यंत व्यस्त आहेत. त्यात रामनवमीचा दिवस असल्याने देवेंद्रजी नागपुरात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भेटी देत होते. अशातच देवेंद्रजींच्या गाड्यांचा ताफा नागपूर येथील टेकडी गणपती मंदिर परिसरातून जात असताना एक ६५ वर्षांचा अपघातग्रस्त इसम देवेंद्रजींना रस्त्याशेजारी आढळला. त्याला पाहताच देवेंद्रजींनी आपला ताफा थांबविला व जखमी व्यक्तीकडे धाव घेतली. सदर व्यक्ती गंभीरपणे जखमी असल्याने त्याला रक्ताच्या उलट्या सुद्धा होऊ लागल्या. त्यामुळे देवेंद्रजींनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून उपचारांची व्यवस्था केली. रुग्णवाहिका जाईस्तोवर देवेंद्रजी घटनास्थळीच थांबले आणि सदर व्यक्तीच्या उपचारांची व्यवस्था लावूनच पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. यापलीकडे जाऊन देवेंद्रजींनी आपली पीआर टीम व उपस्थित गर्दीला सदर घटनेचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई करत संवेदनशीलतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच कर्जत येथील एका १३ वर्षांच्या थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्या वेदांत ठाकरेला देवेंद्रजींमुळे जीवनदान मिळाल्याचे बातमी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. रुग्णसेवेप्रती देवेंद्रजी सदैव तत्पर असतात. रुग्णांप्रती देवेंद्रजी जितके संवेदनशील असतात तितकी संवेदनशीलता क्वचित कुण्या नेत्यामध्ये आढळते. मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष काढला, ज्यामध्ये राज्यातील कुठल्याही गरीब रुग्णाला नि:शुल्क उपचार मिळत होते. देवेंद्रजींच्या या उपक्रमाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला कि २०१४-२०१९ या काळात १५ लाख रुग्णांना ८४२ कोटींचे वैद्यकीय उपचार मोफत मिळाले आणि अनेकांना जीवनदान मिळाले. देवेंद्रजींनी नागपूर येथे उभारलेल्या ५०० खाटांच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आज देशभरातील गरीब रुग्णांना अत्यल्प दरात अत्याधुनिक उपचार मिळत आहेत. एवढेच नव्हे, महाराष्ट्र तंदुरुस्त करण्यासाठी देवेंद्रजींनी नुकताच वल्ड बँकेशी करार करून आरोग्य विभागाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ५,००० कोटींची गुंतवणूक आणली आहे. एवढंच नव्हे, तर गुगल कंपनीशी करार करून महाराष्ट्र सरकार आता AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही निर्माण करणार आहे. त्यामुळे देवेंद्रजींची रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची तुलना फक्त एखाद्या मातेच्या वात्सल्याशीच केली जाऊ शकते. देवेंद्रजींमुळे आजवर अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्या साऱ्यांसाठी देवेंद्रजी हे त्यांचे संकटमोचक हनुमानच आहेत.