कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट | National Cancer Institute Nagpur

देवेंद्रजी फडणवीस यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. अनेक वर्ष ते त्यासाठी उपचार घेत होते. पण कॅन्सरवरील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. तिथे देशभरातून लोक येत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. अखेर नोव्हेंबर १९८८ मध्ये देवेंद्रजींच्या वडिलांचे म्हणजेच गंगाधरराव काशीराव फडणवीस यांचे निधन झाले. त्यावेळी देवेंद्रजींचे वय अवघे १७ वर्ष होते. वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती की, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांतील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जाण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी त्याचवेळी मनोमन नागपूर विदर्भात कॅन्सरवर उपचार करणारे हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरवले होते.

देवेंद्रजींनी वयाच्या १७ व्या वर्षी ठरवल्यानुसार आजच्या घडीला नागपुरातील जामठा परिसरात ४७० बेडचे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार केले जात आहेत. धर्मादाय पद्धतीने चालणारे हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय ठरत आहे. कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था म्हणून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटकडे पाहिले जात आहे. संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा अशा शेजारील राज्यातील लाखो कर्करोग (कॅन्सर) रुग्णांना उपचाराची संजीवनी देणारे अद्ययावत रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. देवेंद्रजी १९८८ मध्ये पाहिलेले स्वप्नं जिद्दीने मागे लागून २०२३ मध्ये ते पूर्णत्वास नेले आणि हे स्वप्नं स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी नव्हते, तर त्यामागे खूप मोठा सामाजिक दृष्टिकोन होता.

National Cancer Institute Nagpur

घटनाक्रम

१९८८

कॅन्सरवर प्रदीर्घ काळ उपचार घेतल्यानंतर देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचे १ नोव्हेंबर १९८८ मध्ये निधन झाले. त्यावेळी तरुण देवेंद्रजींनी मनात एक गोष्ट पक्की केली होती की, आपल्या राहत्या शहरात म्हणजे नागपुरात एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल निर्माण करायचे.

१९९२

देवेंद्रजी विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाजकारणाच्या माध्यमातून १९९२ मध्ये प्रत्यक्ष राजकारणात उतरले. त्यावेळी देखील त्यांनी नागपूरमध्ये एक सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल उभारणार हा आपला संकल्प पुन्हा एकदा जाहीर केला.

१९९९

देवेंद्रजींचे एक जवळचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या पत्नीचे १९९९ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरने निधन झाले होते. त्यावेळी त्यांना देखील जाणवले की, विदर्भातील लोकांना कॅन्सरच्या चांगल्या उपचारांसाठी ८०० किलीमीटरचा प्रवास करून मुंबईलाच जावे लागते. त्यावेळी या दोन मित्रांनी मिळून नागपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारायचे स्वप्नं पाहिले.

२००१

देवेंद्रजी फडणवीस यांनी विदर्भ आणि मध्य भारतातील कॅन्सरच्या रुग्णांना सोयीचे ठरेल असे हॉस्पिटल निर्माण करण्याच्या उद्देशाने २००१ मध्ये डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टची स्थापना आरोग्य सेवेला, विशेष करून कर्करोगावरील उपचार आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती.

२०१२

१८ ऑगस्ट २०१२ रोजी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

२०१५

२८ फेब्रुवारी २०१५ रोजी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे भूमिपूजन पार पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह सुरेश उर्फ भैयाजी जोशी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

एनसीआय भूमिपूजन – ट्विट २८ फेब्रुवारी २०१५

२०१७

प्रसिद्ध उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

एनसीआच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन – ट्विट १३ ऑगस्ट २०१७

एनसीआच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन – यूट्यूब १३ ऑगस्ट २०१७

२०१८

लहान मुलांसाठी २७ बेडची व्यवस्था असलेला पेडिअ‍ॅट्रिक वॉर्ड सुरू करण्यात आला. मध्य भारतातील हे एकमेव कॅन्सर हॉस्पिटल आहे. जिथे लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध आहे. तसेच इथे ऑन्कोलॉजी आयसीयू देखील आहे. इथल्या आंतररुग्ण विभागीय वॉर्ड म्हणजेच आयपीडी प्रायव्हेट वॉर्डचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

कॅन्सरच्या उपचारासाठी देशभरात मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. या हॉस्पिटलद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांना मिळाव्यात यादृष्टिने टाटा ट्रस्ट आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्यात १४ जुलै २०१८ मध्ये कॅन्सरवरील उपचार आणि संशोधनासंदर्भात करार करण्यात आला. हा करार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.

पेडिअ‍ॅट्रिक वॉर्डचे उद्घाटन – ट्विट १४ जुलै २०१८

टाटा ट्रस्ट आणि एनसीआयमध्ये करार – ट्विट १४ जुलै २०१८

कराराबद्दल माहिती देताना – ट्विट १४ जुलै २०१८

२०२१

कोरोना संसर्गाच्या काळात नागपूरमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नागपूर कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोविडवरील उपचाराच्या सुविधा सुरू करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने नागपूर कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली. अनेकवेळा रुग्णांना ते पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती पॅनिक होते. अशावेळी त्यांना योग्य उपचाराबरोबरच समुपदेशन आणि मार्गदर्शनाची असते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि समुपदेशनाच्या टीमने रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली.

कोरोना उपचारासाठी एनसीआय सज्ज – यूट्यूब १५ एप्रिल २०२१,

कोरोना वॉर्डचे उद्घाटन – ट्विट १५ एप्रिल २०२१

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा फाऊण्डेशन मन्थ – यूट्यूब २८ ऑगस्ट २०२१,

कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कामासाठी नागरिकांची मदत – ट्विट १० जुलै २०२१

२०२२

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ‘द विंग्ज’ न्यूजलेटरचे उद्घाटन – ट्विट २१ एप्रिल २०२२, २१ एप्रिल २०२२

एनसीआयमधील फार्मसी स्टोरचे उद्घाटन – ट्विट २६ जानेवारी २०२२

२०२३

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही २७ एप्रिल २०२३ रोजी देशाला समर्पित करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला.

पीआयबी प्रेस नोट – २७ एप्रिल २०२३

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण – ट्विट २७ एप्रिल २०२३

३० वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण – ट्विट २७ एप्रिल २०२३

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण – यूट्यूब २७ एप्रिल २०२३

बालरुग्नांसाठी विशेष वॉर्ड – यूट्यूब २७ एप्रिल २०२३

नागपूरचे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे स्वप्नपूर्ती – यूट्यूब २७ एप्रिल २०२३

                                – यूट्यूब २७ एप्रिल २०२३

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसोबत भावनिक नाते – ट्विट २७ एप्रिल २०२३

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1651504013693820930

नागपूरमध्ये कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार होणार – यूट्यूब २७ एप्रिल २०२३

समाजकार्यात हातभार लावणाऱ्यांचे आभार – यूट्यूब २७ एप्रिल २०२३

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *