महाराष्ट्रातील राजकारणात परस्पर विश्वास आणि सहकार्याचे अनेक अलौकिक प्रसंग पाहायला मिळतात. याच परंपरेला साजेशी अशी एक असामान्य गोष्ट घडून आली. ही गोष्ट राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि नागपूरमधील एक चहाविक्रेता गोपाळ बावनकुळे (Gopal Bawankule Nagpur) यांच्यातील आहे. या गोष्टीचे फलित म्हणजे चहाविक्रेता गोपाळ बावनकुळे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहून एका अनोख्या वचनाच्या गोष्टीची पूर्तता करण्याकडे पाऊल टाकले आहे.
गोपाळ बावनकुळे हे नागपूरचे रहिवाशी आहेत. त्यांचा नागपूरमधील नागपूर-पश्चिम या मतदारसंघातील, नागपूर महापालिकेच्या रामनगर वॉर्डमधील रामनगर चौक येथे चहाचा स्टॉल आहे. बावनकुळे यांनी हा स्टॉल ४ वर्षांपूर्वी टाकला होता. तर दोन-अडीच वर्षांपूर्वी देवेंद्रजी एका कामानिमित्त या परिसरात आले होते. तेव्हा त्यांनी या स्टॉलवर गोपाळ बावनकुळे यांनी बनवलेला चहा प्यायला होता. देवेंद्रजींना हा चहा खूप आवडला होता. त्यावेळी त्यांनी चहाचे कौतुक करत गोपाळ बावनकुळे (Gopal Bawankule) यांना वचन दिले होते की, मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर या स्टॉलवर चहा पिण्यासाठी येणार. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे १३२ आणि महायुतीचे जवळपास २३२ आमदार निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्याचा शपथविधी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला गोपाळ बावनकुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. २ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या शपथविधीचे खास निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणाच्या माध्यमातून देवेंद्रजींनी दिलेल्या वचनातील पूर्ततेची पहिली पायरी पूर्ण केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देवेंद्रजींनी आठवणीने अधिकाऱ्यांना हा निरोप देऊन गोपाळ बावनकुळे यांना शपथविधीसाठी निमंत्रित केले होते.
मुळात देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ बावनकुळे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा चहा पिण्यासाठी येईन, असे वचन दिले होते. पण देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला बावनकुळे यांना बोलावून एक सुखद धक्का दिला. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यावर चहाच्या स्टॉलवर येऊन पुन्ह चहा पिऊ, असे वचन दिले होते. जे त्यांना कधीही करता येणे शक्य होते. पण त्यांनी त्या चहाविक्रेत्यालाच शपथविधीसाठी आमंत्रण देऊन त्याचा सन्मान केला. राजकारणात वचन आणि आश्वासने देणारे अनेक जण असतात. पण त्याची पूर्तता करणारे आणि ती निभावणारे दुलर्भ आहेत. या निवडक दुर्लभ लोकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वरचा क्रमांक आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान येथे देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील नामांकित व्यक्ती, उद्योजक, बॉलीवूडमधील स्टार मंडळी, तसेच महायुतीतील नेत्यांच्या लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. त्यात गोपाळ बावनकुळे यांना खास निमंत्रित म्हणून आमंत्रण देण्यात आले. दोन-अडीच वर्षांपूर्वी चहाच्या स्टॉलवर घडलेल्या त्या एका साध्या प्रसंगाचे हे अप्रतिम रूपांतर होते.
देवेंद्र फडणवीसांचे चहावाल्याला आमंत्रण
या निमित्ताने वचनपूर्ती, मैत्री आणि विश्वासाची एक सुंदर गोष्ट घडून आली. ही गोष्ट फक्त राजकीय संबंधापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी नात्यांमधील दृढ विश्वासाचे आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक बनली. देवेंद्र फडणवीस आणि गोपाळ बावनकुळे (Gopal Bawankule Nagpur) यांच्यातील या वचनपूर्तीच्या आठवणींने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असामान्य गोष्ट घडून आली. ही गोष्ट असामान्य एवढ्यासाठीच ठरते की, राजकारणात फक्त विरोधकांवर मात करून विजय मिळत नसतो. तर कधीकधी दिलेल्या शब्दाचा मान राखण्यात आणि आपल्या सहकाऱ्यांचा, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यातूनही विजय मिळवता येतो. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ही गोष्ट कायमस्वरूपी स्मरणात राहील.
इतर लेख