शिर्डी हे स्थान फक्त महाराष्ट्रापुरते सीमित राहिलेले नाही; हे नाव आता जागतिक पातळीवर पोहोचलेले आहे. त्यामुळे शिर्डीत संपूर्ण जगभरातून पर्यटक येत आहेत. या पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टिने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन वर्षांत शिर्डी विमानतळ सुरू केले. हे देशातील एकमेव असे विमानतळ आहे; जे राज्य सराकरद्वारे चालविले जाते. त्यानंतर शिर्डीसाठी सुपरफास्ट वंदे भारत ट्रेन सुरू केली. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गामुळे शिर्डी हा भाग आता रस्त्यानेही जोडला आहे. शिर्डीमध्ये होत असलेल्या या सुविधांमुळे पर्यटनानिमित्त शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या तर वाढतच आहे. पण त्याचबरोबर शिर्डीसह नजीकच्या जिल्ह्यात उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मितीची संख्या वाढू लागली. परिणामी या जिल्ह्यांची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होत आहे.
शिर्डी विकास प्रकल्प | Shirdi Development Plan
शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील ७०१ किमीचा मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासाची भाग्यरेषा ठरणाऱ्या या सहापदरी महामार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने ५५ हजार कोटी रुपये खर्च केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील शिर्डी ते नागपूर या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन १८ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले होते.
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने जिरायती जमिनीसाठी हेक्टरी ५० लाख रुपये दर निश्चित करण्यात आला होता. काही ठिकाणी सरकारने किमान ४० लाख रुपये ते ८५ लाख रुपये हेक्टरी भाव देण्यात आला आहे. नाशिक, शिर्डी जवळील ज्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध होता. त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचेही मन वळवण्यात फडणवीस यांना यश आले.
शिर्डी ते भरवीर दुसरा टप्पाही सुरू
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या दुसऱ्या टप्प्यात १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, ६ ब्रीज, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत.
श्री साई समाधी शताब्दी महोत्सवासाठी ३ हजार कोटींचा आराखडा
श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आणि शिर्डी आंतराराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभहस्ते १ ऑक्टोबर २०१७ रोजी झाले होते. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य सरकार आणि शिर्डी संस्थानामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी ३२०० कोटी रुपयांचा बृहत आराखडा तयार करण्यात आला होता. या विकास आराखड्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मंजुरी दिली होता. त्याची दोन टप्प्यात विभागणी केली असून पहिल्या टप्प्यासाठी ८०० कोटी रुपयांचा प्लॅन मंजूर करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यासाठी २२३३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती.
श्री साईबाबा संस्थानाच्या अधिनियम २००४ मध्ये सुधारणा
श्री साईबाबा संस्थान अधिनियम २००४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारणा करून, श्री साईबाबा समाधी महाशताब्दी महोत्सवाच्या विकास आराखड्यातील प्रकल्पांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २५ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे विशेष अधिकार देण्यात आले होते. तर व्यवस्थापन समितीला १ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाला मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले होते.
दरम्यान, शिर्डीमधील पाणी पुरवठा आणि सांडपाणी योजनेसाठी ३६.६५ कोटी रुपयांच्या योजनेची देवेंद्र फडणवीस यांनी २२ फेब्रुवारी २०१७ रोजी घोषणा केली होती. त्याचबरोबर
शिर्डी शहरातील विविध ३६.७५ कोटीच्या विकासकामांचा शुभारंभही फडणवीस यांनी केला. या विविध विकासकामांमधून शिर्डीमधील नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा पुरविल्या गेल्या. तसेच ३१ जुलै २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिर्डी पोलीस ठाणे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
साई संस्थानमधील कर्मचारी नियमित
१७ सप्टेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत साई संस्थानातील ६३५ कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा उर्वरित कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत कायद्यातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १० टक्केपेक्षा अधिक खर्च करता येत नाही. त्यामुळे या कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
निळवंडे धरणातून अखेर पाणी सुटले
अहमदनगर जिल्ह्यामधील १९७० मध्ये सुरूवात केलेल्या निळवंडे प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्यात अखेर भाजपा-शिवसेनेचेच सरकार यावे लागले. जवळपास ५० वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाऊन ३१ मे २०२३ रोजी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ ऑक्टोबर २०२३ रोजी निळवंडे धरणाचे जलपूजन आणि कालव्याचे लोकार्पण केले. येणाऱ्या काही दिवसात या धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याची कामे पूर्ण होऊन अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ६४,२६० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. सविस्तर वाचा> निळवंडे धरण कालवे आणि देवेंद्र फडणवीस
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शिर्डीमधून शुभारंभ
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ६ हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून असे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. या योजनेसाठी सरकारने बजेटमध्ये ६,९०० कोटी रुपयांची तरतूद केली होती.
राज्य सरकारद्वारे चालविले जाणारे एकमेव विमानतळ
शिर्डी हे देशातील एकमेव असे विमानतळ आहे; जे एका राज्य सरकारने सुरू केले आहे आणि व्यावसायिक पातळीवरसुद्धा हे विमानतळ राज्य सरकार स्वत: चालवत आहे. हे विमानतळ अवघ्या दोन वर्षात पूर्ण झाले. या विमानतळासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सर्व परवानग्या मिळवल्या होत्या. इतक्या जलदगतीने पूर्णत्वास येणारे हे भारतातील दुसरे विमानतळ आहे. शिर्डी विमानतळ हे फक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी फायद्याचे नाही. तर शिर्डी आणि आसपासच्या परिसराची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद या विमानतळात आहे. या एका विमानतळाच्या माध्यमातून इथे २० ते २५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. या एका विमानतळामुळे इथे हॉटेलिंग, हॉस्पिटॅलिटी आणि इतर सेक्टरचे उद्योगधंद्ये इथे उभारले जात आहे.
शिर्डी विमानतळासाठी अतिरिक्त १३६७ कोटी
शिर्डी विमानतळाची पुढील टप्प्यातील आणि उर्वरित कामे करण्यासाठी राज्य सरकारने ४९०.७४ कोटी रुपयांच्या सुधारित मागणीला मान्यता दिली. तसेच विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीसाठी आणि अॅप्रॉनचे विस्तारीकरण व तत्सम कामांसाठी ८७६.२५ कोटी रुपयांना मंजुरी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
मुंबई – शिर्डी प्रवास सुपरफास्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईतून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत या सुपरफास्ट ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. २०१७ मध्ये शिर्डी विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर सरकारने शिर्डीसाठी आता सुपरफास्ट वंदे भारत ट्रेन दिली आहे.
शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय
अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना महसुलाशी संबंधित कामांसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयात जावे लागते. यामुळे नगर जिल्ह्यातील नागरिकांचा खूप वेळ जात होता. त्यासाठी राज्य सरकारने शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय १३ जून २०२३ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या कार्यालयासाठी ६ पदांची निर्मिती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
संबंधित व्हिडिओ: