हिंदुत्ववादी

आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद २०२५; मंदिरे श्रद्धा, समता आणि ज्ञानाची केंद्र!

मंदिरे ही फक्त आपली धार्मिक स्थळे नसून, ती समाजाच्या सर्वांगिण विकासाची केंद्र आहेत. पूर्वीच्या मंदिरातून धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शिक्षण, संस्कृती आणि समाजसुधारणेचे काम चालत होते. मुळात मंदिरांची केंद्रबिंदू हीच होती. आपली मंदिरे पूर्वीपासून ज्ञानकेंद्र होती आणि ती इथून पुढेही तशीच राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तिरुपती येथे आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद व प्रदर्शन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी वरील विचार व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भूमिका जशी स्पष्ट असते. अगदी त्याचप्रमाणे त्यांची हिंदुत्ववादी आणि सनातनी भूमिका कधीच लपून राहिलेली नाही. त्यांच्या मते सनातन धर्म हा फक्त एक धर्म नसून ती एक जीवनपद्धती आहे. हा धर्म, ही पद्धती लोकांना एकत्र बांधून ठेवते. त्याचबरोबर त्यांच्यात सामाजिक एकता निर्माण करते. आपली मंदिरे ही आपल्या आस्थेचे प्रतिक तर आहेतच. पण त्याचबरोबर ती शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि अभिसरणाची केंद्रे आहेत. प्राचीन काळात काशी हे जसे धार्मिक स्थळ म्हणून परिचित होते. तसेच ते शिक्षणाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते. त्याचबरोबर मद्रास प्रांतात त्यावेळी ५० हजारांहून अधिक वेदशाळा अस्तित्वात होत्या. त्यातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत होते. यावरून हेच स्पष्ट होते की, आपली मंदिरे ही फक्त धार्मिक स्थळे नाहीत, तर ती समाजातील लोकांना शिक्षण आणि समतेच्या दिशेने नेणारी प्रेरणास्थान आहेत. मंदिरांमधून समाजिक समरसता, एकात्मता आणि सामाजिक अभिसरणाचा संदेश दिला जातो. सनातन धर्माने नेहमीच समानतेचा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला आहे. मंदिरे ही या मूल्यांची जोपासना करणारी केंद्रे बनली पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांना वाटते.

धार्मिक पर्यटन आणि अर्थव्यवस्था

एका सर्व्हेक्षणानुसार आज भारतातील ५५% पर्यटन हे धार्मिक पर्यटनावर आधारित आहे. जम्मू-काश्मीरपासून ते केरळ-कन्याकुमारीपर्यंत तसेच जगन्नाथ पुरीपासून ते गिरनार-द्वारका येथील मंदिरांना दरवर्षी कोट्यवधी लोक भेट देतात. यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळेच देशातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांचा फक्त धर्माशी संबंध लावणे योग्य नाही. यातून देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होते. पूर्वीप्रमाणे आताची मंदिरे फक्त आस्थेचे ठिकाण राहिलेले नाही. तर ती आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. धार्मिक पर्यटनामुळे लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. स्थानिक व्यवसायात वाढ होत आहे आणि त्यातून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1891515069504336195

टेम्पल कन्वेन्शन: एक महत्त्वपूर्ण पाऊल

देशातील मंदिरांचे प्रभावी व्यवस्थापन आणि त्यातून समाजहित साधणे या उद्देशाने ‘टेम्पल कन्वेन्शन’ मोठे काम करत आहे. या कन्वेन्शनच्या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनाच्या दहा महत्त्वाच्या घटकांवर काम केले जात आहे. भारतातील प्रसिद्ध मंदिरे कशा प्रकारे व्यवस्थापित केली जातात, याचा अभ्यास करून संपूर्ण देशातील मंदिर व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिर व्यवस्थापनाला एक योग्य दिशा देऊन सनातन धर्माची उंची वाढेल आणि तो आधुनिक व्यवस्थापन कौशल्यांमुळे अधिक प्रभावी होईल, यासाठी टेम्पल कन्वेन्शन कार्यरत आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1891505066911146244

आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद व प्रदर्शन २०२५ (International Temple Convention Expo 2025) हा कार्यक्रम तिरुपती येथील आशा कन्वेन्शन्स येथे १७ ते १९ फेब्रुवारी या दरम्यान होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती दर्शवून हिंदुत्व, सनातन धर्म आणि आपल्या मंदिरांचे महत्त्व विषद करणारी भूमिका मांडली. या कार्यक्रमास आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. जगातील सर्वांत मोठ्या मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या आधुनिक आणि पारंपरिक पद्धती यांचा समन्वय साधण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले. २०२३ मध्ये या संस्थेने वाराणसी येथे पहिली परिषद आयोजित केली होती. त्यानंतर ही दुसरी परिषद तिरुपती येथे आयोजित केली. या परिषदेसाठी विविध तज्ज्ञ, पुजारी, विद्वान, मंदिरांचे व्यवस्थापक तसेच ५८ देशांतील सुमारे १५८१ धार्मिक संस्था तर ३८९ आंतरराष्ट्रीय पातळीवरील मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. परिषदेत १११ हून अधिक मान्यवर वक्ते सहभागी झाले असून त्यांनी कार्यशाळा व ज्ञानसत्रांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या निमित्ताने येथे विविध वस्तुंच्या स्टॉल्सचे प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *