सीएम फेलोशिप कार्यक्रम – टाईमलाईन मे २०१५ – राज्यातील तरुणांनी राज्यातील विकास प्रक्रिया आणि त्यातील…
युवा शक्तीच्या नवकल्पनांना प्रशासकीय बळ देणारा उपक्रम!
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम (CM Fellowship Program) हा महाराष्ट्र सरकारने उच्चशिक्षित आणि उत्साही तरुणांना थेट सरकारच्या धोरणांमध्ये आणि विकासात्मक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी उपलब्ध करून दिलेली एक अनोखी संधी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाद्वारे प्रशासनाच्या विविध स्तरावर तरुणाईचा सहभाग वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत, धोरण निर्मितीत नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होत आहे. या फेलोशिपमुळे तरुणांना महाराष्ट्रातील विकासात्मक कार्यक्रमांची माहिती मिळत आहे. तसेच त्यांना सरकारच्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत आहे. मुख्यमंत्री फेलोशिप (Chief Minister Fellowship) कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करत आहेत. काही फेलोजनी या भविष्यात सरकारसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा
राज्यातील तरुणांनी राज्यातील विकास प्रक्रिया आणि त्यातील टप्पे जाणून घ्यावेत. तसेच या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावे, इथल्या कामाची पद्धत समजून घ्यावी. तसेच तरुणांनी समर्पित वृत्ताने समाजसेवा करावी. देशाचे सुजाण आणि सज्ञान नागरिक म्हणून तयार व्हावे यासाठी राज्यातील तरुणांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ मे २०१५ मध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - २९ मे २०१५
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - २९ मे २०१५
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - २९ मे २०१५
GR
Useful Links
फेलोशिप कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत बदल
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१६ साठी सरकारने नव्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया अवलंबवली. २०१६ मध्ये निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत काही बदल केले. जसे की, २०१५ मध्ये किमान गुणांची आवश्यकता ७५ टक्के होती. ती २०१६ मध्ये ६० टक्के इतकी केली. तसेच फेलोंची संख्या २०१६ मध्ये ५० निश्चित करण्यात आली.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - २० मे २०१६
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - २० मे २०१६
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - २० मे २०१६
GR
Useful Links
फेलोजची संख्या वाढवली
सन २०१६-२०१७ या वर्षासाठी ५० फेलोंची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण २०१५-२०१६ वर्षात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून २०१६-१७ या वर्षासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका, एमआयडीसी तसेच मंत्रालयातील प्रशासकीय विभागाकडून फेलोंची मागणी होत होती. त्यामुळे २०१६-२०१७ या वर्षासाठी अधिकचे १० फेलो घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - २४ ऑगस्ट २०१६
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - २४ ऑगस्ट २०१६
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - २४ ऑगस्ट २०१६
GR
Useful Links
फेलोजच्या कमाल वयात वाढ
मुख्यमंत्री फेलोशिप योजना २०१७ च्या निवड प्रक्रियेत किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ, इंटर्नशीप/अॅप्रेटिंसशिप/आर्टिकलशिप केलेली असावी, असा समावेश करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे कमाल वय २५ वरून २६ करण्यात आले.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - २४ मे २०१७
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - २४ मे २०१७
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - २४ मे २०१७
GR
Useful Links
मुलींसाठी एक तृतीयांश जागा राखीव
मुख्यमंत्री फेलोशिप योजना २०१८ च्या निवड प्रक्रियेत कोणत्याही शाखेचा किमान ६० टक्के गुण मिळवणारा पदवीधर या शैक्षणिक अर्हतेसोबतच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर एकूण फेलोंच्या संख्येत मुलींचे प्रमाण १/३ राहील. एवढ्या संख्येने मुली उपलब्ध झाल्या नाही तर त्याऐवजी मुलांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - १८ एप्रिल २०१८
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - १८ एप्रिल २०१८
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - १८ एप्रिल २०१८
GR
Useful Links
मुख्यमंत्री फेलोशिपच्या मानधनात वाढ
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९ च्या निवड प्रक्रियेत, कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराचे पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक दिनांक १ जून २०१९ पूर्वीचे असावे, असा निर्णय घेण्यात आला. तसेच मुख्यमंत्री फेलोशिप योजना (Chief Minister Fellowship) २०१९ साठी निवड झालेल्या फेलोला मानधन म्हणून ४० हजार रुपये आणि प्रवासखर्चासाठी ५ हजार रुपये असे एकत्रित ४५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - २४ मे २०१९
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - २४ मे २०१९
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - २४ मे २०१९
GR
Useful Links
आघाडी सरकारद्वारे सीएम फेलोशिप कार्यक्रमाला स्थगिती
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९ च्या निवड प्रक्रियेत, कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराचे पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक दिनांक १ जून २०१९ पूर्वीचे असावे, असा निर्णय घेण्यात आला. तसेच मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९ साठी निवड झालेल्या फेलोला मानधन म्हणून ४० हजार रुपये आणि प्रवासखर्चासाठी ५ हजार रुपये असे एकत्रित ४५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - २० जानेवारी २०२०
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - २० जानेवारी २०२०
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - २० जानेवारी २०२०
GR
Useful Links
सीएम फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू
जून २०२२ मध्ये राज्यात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलली आणि राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी महाविकास आघडी सरकारने स्थगिती दिलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने पुन्हा सुरू करण्याची घोषणा दिली. त्यानुसार २० जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा (Chief Minister Fellowship) शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी पूर्वी ५० तरुणांची निवड केली जात होती. ती २०२३ मध्ये ६० करण्यात आली. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ७५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ - २० जानेवारी २०२३
Photo Gallery
माहिती अस्तित्वात नाही
YouTube
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीची सोशल मीडियामधील चर्चा - २० जानेवारी २०२३
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंबंधीचे GR आणि इतर लिंक्स - २० जानेवारी २०२३
GR
Useful Links
महाराष्ट्राच्या धोरण निर्मितीत नव्या विचारांना बळ देणारा उपक्रम!
मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम हा महाराष्ट्रातील तरुणांच्या क्षमतांचा योग्य उपयोग करून घेणारा राज्य सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारला नवोदित आणि ऊर्जावान तरुणांना प्रशासन आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी करुन देण्याची संधी मिळाली. त्याचा उपयोग प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी करण्यासाठी झाला. तसेच या फेलोशिपमुळे तरुणांना प्रशासकीय अनुभवाबरोबरच राज्याच्या विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या धोरणनिर्मिती आणि प्रशासनात नव्या विचारांची भर पडली. भविष्यात या कार्यक्रमाचा राज्याच्या सर्वांगीण विकासावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.