राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डायनॉमिक आणि टेकसॅव्ही नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुख्यमंत्री असताना प्रशासन आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा उपयोग केला, तो वाखाणण्याजोगा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तंत्रज्ञानाचा कल्पक पद्धतीने वापर करणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचे नाव घ्यावे लागेल. तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांनी नागरी सेवांमध्ये सुधारणा केली. नागरिकांच्या अडचणी, प्रश्न समजून घेण्यासाठी, तसेच त्यांच्या समस्यांवर तात्काळ मार्ग काढण्यासाठी इनोव्हेटीव्ह प्लॅटफॉर्म तयार केले. त्यांच्या या टॅकसॅव्ही दृष्टीकोनामुळे ते महाराष्ट्राच्या डिजिटल युगाचे मार्गदर्शक ठरले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे नेहमीच नवीन आयडिया, सूचना आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर असतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना जर मदत होणार असेल, तर त्याचा लगेच वापर केला पाहिजे, अशी त्यांची आग्रही भूमिका असते. राजकारणात आल्यापासून प्रशासनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाची कशी मदत होऊ शकते. याचा त्यांनी वेळोवेळी प्रत्यय दिला आहे. टेक्नॉलॉजीची ताकद ओळखून त्यादृष्टिने त्यांनी काम केले. याचेच फलित म्हणून आज राज्यातील नागरिक राईट टू सर्व्हिस (लोकसेवा हमी कायदा) कायद्यांतर्गत जवळपास ३८ विभागातील ४०० हून अधिक सेवांचा लाभ ऑनलाईन घेत आहेत. डेटा ड्रिव्हन, डिजिटल इन्फ्रास्क्ट्रचर आणि मॉर्डन कम्युनिकेशन टूल्सचा वापर देवेंद्रजींनी प्रशासनात सहजता आणली.
डिजिटल महाराष्ट्र: तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनाचे ट्रान्सफॉर्मिंग
ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या फ्लॅगशिप कार्यक्रमाचा खुबीने वापर करत महाराष्ट्राच्या प्रशासनाचे ट्रान्सफॉर्मिंग केले. तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी नवनवीन योजना सुरू केल्या आणि प्रशासनातील मरगळ झटकून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांची कार्यक्षमता वाढवली.
‘आपले सरकार’ वेबपोर्टल
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले. त्यापैकी एक म्हणजे ‘आपले सरकार’. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सरकारने प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक पारदर्शक, सुलभ आणि गतिमान केला. डिजिटल युगात सरकारशी नागरिकांनी थेट संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे लगेच निवारण व्हावे. त्याचबरोबर विविध सरकारी सेवा त्यांना घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध व्हाव्यात, या हेतुने आपले सरकार पोर्टल विकसित करण्यात आले. आपले सरकार पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट स्मूथ आणि जलद ई-गव्हर्नन्स हे आहे. यामुळे प्रशासनाच्या कामातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली. नागरिकांना सरकारी सेवा दिलेल्या मुदतीत आणि सुलभपणे मिळू लागल्या. यासाठी त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागत नाही. त्यांच्या तक्रारींचे निवारणही लगेच होऊ लागले. डिजिटल सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करून ती शेवटच्या घटकापर्यंत उपलब्ध करून देण्यात आपले सरकार पोर्टल यशस्वी ठरले.
वाय-फाय मुंबई
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये मुंबई वाय-फाय प्रोजेक्ट लॉन्च केला होता. या प्रोजेक्टच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येने पब्लिक वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणारे शहर म्हणून मुंबईत तसे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले. जवळपास ५०० ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट बसविण्यात आले. यातून नागरिकांना मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली गेली. या योजनेतून नागरिकांना फक्त मोफत इंटरनेट उपलब्ध करून देणे अपेक्षित नव्हते. तर तंत्रज्ञान हा आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. डिजिटल लिटरसी आणि त्याची उपलब्धता ही सुद्धा सरकारची जबाबदारी असल्याने, सरकारने प्राधान्याने नागरिकांना तंत्रज्ञानाशी संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
पाणी व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाची मदत
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला. या प्रकल्पाच्या प्रभावशाली अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. जलसंवर्धानासाठी योग्य ठिकाणे निवडण्यासाठी जिओस्पेशल तंत्रज्ञानाचा (भौगोलिक तंत्रज्ञान) वापर केला. प्रकल्पांची आखणी करण्यासाठी जीआयएस मॅपिंग आणि ड्रोन सर्व्हेची मदत घेतली. यातून झालेल्या कामांमुळे दुष्काळग्रस्त भागांमधील पाण्याची पातळी एक-दोन वर्षातच आश्चर्चकारकरीत्या वाढली. अशाप्रकारे पर्यावरणाशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा सकारात्मक पद्धतीने वापर करण्यात आला.
मुख्यमंत्री वॉररूम – Digital Maharashtra
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, हे पाहण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सीएम डॅशबोर्ड तयार केला होता. हा डॅशबोर्ड म्हणजे एक प्रकारची वॉररूमच होती. या वॉररूममध्ये राज्यातील नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची, प्रकल्पांची रिअल टाईममध्ये माहिती घेतली जात होती. जिथे अडचणी निर्माण होत होत्या. त्या लगेच आयडेन्टिफाय करून तिथल्या तिथे मार्गी लावल्या जात होत्या. या वॉररूममध्ये सरकारी अधिकाऱ्यांसह काही तज्ज्ञ व्यक्तीही सहभागी होत्या आणि या सगळ्यांचे नेतृत्व स्वत: देवेंद्र फडणवीस करत होते. याच वॉररूमच्या माध्यमातून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सी लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीत विमानतळ, समृद्धी महामार्गा, जलयुक्त शिवार अभियान, मुंबई मेट्रो आदी प्रकल्पांचा आढावा घेतला गेला.
सीएम ऑडिओ ब्रिज
देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये ‘सीएम ऑडियो ब्रिज’ हा नाविन्यापूर्ण कार्यक्रम राबविला होता. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या गावातील लोकांशी संपर्क साधला. गावातील लोकांचे प्रतिनिधी म्हणून सरंपंचांच्या माध्यमातून फडणवीस यांनी तिथल्या समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने समजून घेतल्या. राज्यातील जवळपास ८८४ संरपंचांनी आपल्या गावातील समस्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. या ऑडिओ ब्रिजमध्ये २७ हजार ४४९ लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी झाले होते. फडणवीस यांनी या समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या तिथे निर्देश देऊन त्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. यामुळे अनेक गावातील नेमक्या समस्या सरकारपर्यंत पोहोचल्या आणि त्यावर सरकारकडून लगेच तोडगाही काढण्यात आला. या ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून सरकारने पाणीटंचाईशी संबंधित समस्यांवर विशेष लक्ष दिले. ज्यामध्ये गावांमध्ये पाण्याचे टँकर पुरवणे, जुन्या झालेल्या पाण्याच्या योजना दुरूस्त करणे, जिथे गरज आहे तिथे नवीन पाईपलाईन टाकणे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविणे आदी कामे करण्यात आली.
माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी टेकसॅव्ही अॅप्रोच
राजकीय घडामोडी असो किंवा सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती असो, देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत फर्स्ट हॅण्ड पोहोचवली. यासाठी त्यांनी फेसबुक, ट्विटर (आता एक्स), इन्स्टाग्राम, युट्यूब यांचा योग्य पद्धतीने वापर केला. सध्या अद्ययावत म्हणजेच लेटेस्ट माहितीला खूप महत्त्व आहे. तेच महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्रजींनी सरकारी विभागांनाही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत लेटेस्ट माहिती पोहोचविण्याची सुविधा निर्माण केली.
देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाची ताकद ओळखून प्रशासनात त्याचा वापर करून महाराष्ट्राच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे. त्यांच्या टेकसॅव्ही अॅप्रोचमुळे प्रशासनातील कारभाराला गती मिळाली. नागरिकांना अत्यंत कमी वेळेत जलद सेवा मिळू लागल्या. त्याचबरोबर त्यांचा सरकार आणि प्रशासनासोबतचा संपर्क वाढला. तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, तंत्रज्ञानाने एवढी मजल मारली, अशी वाक्ये आपण नेहमी एकतो. पण या तंत्रज्ञानाचा सरकार म्हणून लार्ज स्केलवर वापर करण्याचे धाडस फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच दाखविले. त्यांनी ते यशस्वीपणे वापरून लोकांना त्याचा लाभदेखील मिळवून दिला. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने सामाजिक आणि आर्थिक बदल कसे घडवून आणू शकतो, हे सिद्ध करून दाखवले आहे.