Mumbai Trans Harbour Link (अटल सेतू)मुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला जोरदार चालना मिळणार!

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने देशातील पहिला आणि सर्वात मोठा Mumbai Trans Harbour Link हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. Mumbai Trans Harbour Link हा केवळ एक ब्रिज नाही तर इकनॉमिक कॉरिडॉर आहे. महाराराष्ट्राचा ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन जातो असे म्हटले तर, ते चुकीचे होणार नाही. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पुढील वीस वर्षे जोरदार चालना या फक्त एका ब्रिजमुळे मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाच्या चिर्ले येथील दुसऱ्या टप्प्याच्या औपचारिक लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केला.

अटल सेतू -Devendra fadnavis in Mumbai Trans Harbour Link launch
Mumbai Trans Harbour Link

या पूलाच्या उभारणीच्या वेळेस पर्यावरणाची सर्वात मोठी अडचण निर्माण झाली होती. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगी मिळावी, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या . गेल्या तीन दशकांपासून या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगी मिळत नव्हती, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठिंब्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला अवघ्या 3 महिन्यांतच पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले व हे काम पूर्ण होत आले असून हा ट्रान्स हार्बर लिंक लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल.

शिवडी खाडी येथील Mumbai Trans Harbour Link पूलाच्याखाली सुरुवातीच्या टोकाला बाहेरील देशातून मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला कुठल्याही प्रकारचा धक्का न पोचवता त्यांच्यासाठी अभयारण्य निर्माण करण्याचा आणि या पुलाचा वापर करणाऱ्या वाहनांचा परिणाम फ्लेमिंगोच्या अधिवासावर होऊ नये म्हणून पुलावर खाडीच्या ठराविक भागापर्यंत ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्याच्या तसेच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कांदळवनाचे पुनर्जीवन करण्याच्या सूचना पर्यावरणप्रेमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत.

अटल सेतू -Devendra fadnavis in Mumbai Trans Harbour Link launch
Mumbai Trans Harbour Link

मुंबई हे बेटांचे शहर आहे. या बेटांच्या शहराला मुख्य जमिनीशी जोडण्याचे काम या पूलामुळे होणार आहे. आर्थिक,व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईला काही मिनिटातच या पूलामुळे पोहचता येणार आहे. या पुलामुळे मुंबई हे निश्चित प्रमुख गुंततवणुकीचे स्थान असणार आहे. ट्रान्स हार्बर लिंकच्या नवी मुंबईकडील बाजूला नैनाचा विभाग येणार असून त्या ठिकाणापासून मल्टीडोअर कॉरिडॉर जाणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल हा जगातील सर्वात मोठ्या असलेल्या १० सागरी पुलांपैकी आपल्या देशातील पहिला सर्वात मोठा सागरी पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी 16 कि मी असून जमिनीवरील लांबी 5.5 किमी इतकी आहे. हा पूल 6 पदरी असून या पुलाच्या दोन्ही मार्गावर 3/3 मार्गिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या पूलाची ऊंची समुद्रापासून 25 मीटर असून रुंदी 27 मीटर इतकी आहे. या पुलाच्या पीलरची उभारणी 40 मीटर खोल ड्रिल करून करण्यात आली आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त क्षमता या पूलाची असणार आहे. हा पूल अभियांत्रिकी चमत्कार (इंजिनियरिंग मार्व्हल) असल्याचं बोललं जात आहे .

Devendra Fadnavis is InfraMan for Maharashtra
Mumbai Trans Harbour Link

या पुलाचे बांधकाम आयएचआय ,टाटा, लार्सन टूर्बो, डेवू या कंपन्यांनी केले आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे वेळेची, इंधनाची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. या सागरी सेतूचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी 18 हजार कोटी खर्च झाला आहे. हा पूल डिसेंबेर अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी शक्यता आहे. या सी लिंक रोडवरून अवग्या 20 मिनिटांत रायगड जिल्ह्यातील चिर्ले येथे पोहचता येणार आहे. हा पूल प्रत्यक्ष सुरु झाल्यावर मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून सततच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या मुंबई आणि नवी मुंबईच्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *