मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी | Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमांतर्गत १९६७ मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी, मुंबई, असा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या ट्रस्टमार्फत नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध ११ प्रकारच्या कारणांनी पीडित असलेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य पुरवले जाते. यामध्ये आरोग्याशी संबंधित हृदयविकार, किडनी, मूत्रपिंडरोपण, मेंदू आणि कर्करोग आदी गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याकरीता व उपचाराकरीता अर्थसहाय्य पुरवण्याची तरतूद आहे. पण ही सुविधा देत असताना त्याच्या संनियंत्रणाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नव्हती. परिणामी गरजूंना योग्यवेळी मदत मिळण्यात अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आरोग्याशी संबंधित सेवा योग्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी या ट्रस्ट अंतर्गत ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ असा नवीन कक्ष १३ ऑगस्ट २०१५ रोजी स्थापन केला. या माध्यमातून जवळपास ५५० कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर वेळोवेळी मुख्यमंत्री सहायता निधीच्या उद्दिष्टांमध्ये नवीन गोष्टींचाही समावेश केला. त्याचाही आपण आढावा घेणार आहोत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी – Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi

१९६७

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ या नावाने सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली होती. त्याचा शासन निर्णय २ मार्च १९६७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. या ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती.

मुख्यमंत्री सहायता निधी ट्रस्टची स्थापना – शासन निर्णय २ मार्च १९६७

२००१

मुख्यमंत्री सहायता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीचे नियम, ध्येय आणि उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली. १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे सदर ट्रस्टची ८ ध्येय आणि उद्दिष्ट्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यात खालील गोष्टींचा समावेश होता. 

  1. राज्यातील तथा देशातील नैसर्गिक आपत्तीतील आपदग्रस्तांना निकषांच्या अधीन राहून आर्थिक व इतर स्वरूपात मदत करणे. यामध्ये आपत्तीदरम्यान जी सरकारी मदत दिली जाते. त्या व्यतिरिक्त ही मदत आहे.
  2. जातीत दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना, तसेच जखमी व्यक्तींना आणि मालमत्तेचे नुकसान झालेल्या व्यक्तींना निकषांच्या अधीन राहून आर्थिक व इतर स्वरूपातील मदत करणे.
  3. नक्षलवाद्यांच्या हल्लात हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना व वारशांना, जखमी झालेल्या व्यक्तींना निकषांच्या अधीन राहून आर्थिक व इतर स्वरूपातील मदत करणे.
  4. हृदयविकास, किडनी, मूत्रपिंडरोपण, मेंदू व कर्करोग आदी गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना शस्त्रक्रिया व उपचाराकरीता अर्थसहाय्य करणे.
  5. अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारशांना व जखमी व्यक्तींना निकषांच्या अधीन राहून आर्थिक मदत करणे. यामध्ये मोटार, रेल्वे, विमान आणि बोट अपघात वगळण्यात आले आहेत.
  6. अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थांना वेगवेगळ्या पातळीवर मदत करणे.
  7. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संमेलने, परिषदा, चर्चासत्रे यांच्या आयोजनाकरीता देणगी स्वरूपात मदत करणे.
  8. शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांच्या इमारतीच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करणे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टची उद्दिष्ट्ये – शासन निर्णय १५ नोव्हेंबर २००१

२०१५

मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत विविध प्रकारच्या दुर्धर आजारांवरील उपचारांकरीता रुग्णांना आर्थिक मदत पुरवली जाते. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आर्थिक मदत मिळवण्यासाठी असंख्य अर्ज येतात. अशा रुग्णांच्या अर्जाची योग्य वेळेत पडताळणी व तपासणी करून त्यांना लगेच मदत उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला. तसेच या कक्षाच्या अंतर्गत एका कार्यकारिणी समितीची स्थापन देखील करण्यात आली. या समितीत सरकारच्या महत्त्वाच्या रुग्णालयाचे अधिक्षक, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय सहायत कक्ष समन्वयक आणि आरोग्य सल्लागार यांचा समावेश करण्यात आला.

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ स्थापन – परिपत्रक १३ ऑगस्ट २०१५

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत 

कालावधी – १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१५ 

या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी ७ हजार ९३ अर्ज आले होते. त्यातील ४ हजार ८६७ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना ३४ कोटी ८२ लाख ८ हजार ६७९ रुपयांची मदत करण्यात आली.

२०१६

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत 

कालावधी – १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७

या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी १७ हजार १५० अर्ज आले होते. त्यातील १३ हजार १४६ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १४५ कोटी ७६ लाख १५ हजार ५०१ रुपयांची मदत करण्यात आली.

एप्रिल २०१७

मुख्यमंत्री सहायता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने ८ प्रकारची ध्येय आणि उद्दिष्ट्ये १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये ९ आणि १० या दोन नवीन उद्दिष्टांचा समावेश केला.

  1. दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करताना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणा, विकास कामे, प्रतिबंधात्मक योजना यासाठी कंपनी अधिनियम २०१३ अन्वये स्थापित झालेल्या ना नफा तत्वावरील कंपन्यांना आर्थिक मदत करणे.
  2. यापूर्वी स्थापित झालेल्या कोणत्याही सीएसआरची (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी) उद्दिष्ट्ये पूर्ण करणाऱ्या संस्थेला किंवा कंपनीला आर्थिक मदत करणे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्ट उद्दिष्ट्ये सुधारणा – शासन निर्णय १७ एप्रिल २०१७

जुलै २०१७

मुख्यमंत्री सहायता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने ८ प्रकारची ध्येय आणि उद्दिष्ट्ये १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ९ आणि १० या दोन नवीन उद्दिष्टांचा समावेश केल्यानंतर जुलै २०१७ मध्ये शेती कर्जाशी संबंधित आणखी एका नवीन उद्दिष्टाचा समावेश केला.

  1. राज्यातील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सरकारी योजनेला आर्थिक मदत करणे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्ट उद्दिष्ट्ये सुधारणा – शासन निर्णय ६ जुलै २०१७

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत 

कालावधी – १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८

या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी २७ हजार १८५ अर्ज आले होते. त्यातील १६ हजार ९१३ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १५९ कोटी ५४ लाख ३८ हजार ७०० रुपयांची मदत करण्यात आली.

मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक लोक लाभान्वित झाले – १२ नोव्हेंबर २०१७

२०१८

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत 

कालावधी – १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९

या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी ३४ हजार २६१ अर्ज आले होते. त्यातील १८ हजार ८३६ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १८८ कोटी ७१ लाख ९९ हजार २०६ रुपयांची मदत करण्यात आली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून १५ लाख गरजू रुग्णांना ८४२ कोटी रुपयांच्या उपचारांचा लाभ – फेसबुक ७ नोव्हेंबर २०१८, ट्विट ७ नोव्हेंबर २०१८

मुख्यमंत्र्यांच्या मदतीने वेदांतला मिळाले जीवन! – १५ एप्रिल २०१८

कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत – २३ मे २०१८

मुख्यमंत्री निधीतून ४२ हजार रुग्णांना मदत – १ ऑगस्ट २०१८

तन्वीर शेख या चिमुकल्याचे आयुष्य बदलले – ५ नोव्हेंबर २०१८

२०१९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे औरंगाबादमधील वेदांत भागवत पवार (रा. कनकोरी, ता. गंगापूर) या कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाले होते. मोलमजुरी करणाऱ्या वेदांतचे आई-वडिल आणि त्याची आत्या यांनी अत्यंत कृतज्ञभावनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १०१ रुपयांची मदत पाठविली होती. ही मदत नेमकी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे २२ जुलै २०१९ रोजी आली होती. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

वेदांतची आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी यांनी वेदांतच्या उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी मॅसेज केला होता. त्या मॅसेजची दखल घेत देवेंद्रजींनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून वेदांतच्या उपचारासाठी १ लाख ९० हजार रुपयांची मदत केली होती.

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत 

कालावधी – १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२०

या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी २२ हजार ९३ अर्ज आले होते. त्यातील ८ हजार ८१० रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना ६९ कोटी ४९ लाख ८८ हजार ७१५ रुपयांची मदत करण्यात आली.

मुख्यमंत्री सहायता निधीतून जालन्यातील चिमुकलीच्या हृदयावर शस्त्रक्रिया – १९ जानेवारी २०१९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेमुळे होत आहे अनेकांना मदत. 

नागपूरच्या श्री.यशवंत वाघ या दिव्यांग बांधवाला मिळाला शासनाकडून मदतीचा हात…- २४ जानेवारी २०१९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत – ११ मार्च २०१९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत ही गरिबांसाठी आरोग्याच्या चिंता मिटवणारी – १९ मार्च २०१९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे मिळाले जीवनदान – ३० मार्च २०१९

मुख्यमंत्री सहायता निधीतून ५५० कोटींची मदत – २३ जून २०१९

एक पुढाकार मदतीचा, हक्काचा …- १७ सप्टेंबर २०१९

२०२०

मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाख आणि पंतप्रधान निधीतून 3 लाख रूपयांची मदत – ३ ऑगस्ट २०२०

२०२२

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत 

कालावधी – १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३

या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी १४ हजार ५६६ अर्ज आले होते. त्यातील ७ हजार ४१९ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना ५७ कोटी ४४ हजार ७०० रुपयांची मदत करण्यात आली.

२०२३

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात आलेली वैद्यकीय मदत 

कालावधी – १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी वर नमूद केलेल्या कालावधीत ३२ हजार २९९ अर्ज आले होते. त्यातील १८ हजार ८५९ रुग्णांना मदत करण्यात आली. या रुग्णांना १५९ कोटी ६६ लाख ८२ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात आली.

२०२४

मुख्यमंत्री सहायता निधी ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने ८ प्रकारची ध्येय आणि उद्दिष्ट्ये १५ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ९ आणि १० या तर जुलै २०१७ मध्ये शेती कर्जाशी संबंधित आणखी एका नवीन उद्दिष्टाचा समावेश केला. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये महायुती सरकारने कोव्हिडशी संबंधित आणखी एका उद्दिष्टाचा समावेश केला.

१२. सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी भविष्यात कोविड किंवा कोविड सदृश्य अन्य संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव  उद्भवल्यास तो रोखणे तसेच त्यावरील उपचारांसाठी अद्ययावत आरोग्यविषयक पायाभूत सुविधांनी महाराष्ट्र राज्य सुसज्ज असणे आवश्यक आहे. याकरीता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिने पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (कोविड-१९) अर्थसहाय्य देणे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्ट उद्दिष्ट्ये सुधारणा – शासन निर्णय १६ मार्च २०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *