माणसाचे जीवन शाश्वत नाही; कधी कोणावर कोणती वेळ येईल? सांगता येत नाही. मग ते आजारपण असो किंवा आर्थिक संकट. आयुष्यात काय वाढून ठेवले आहे, हे माहीत नसणारा सर्वसामान्य व्यक्ती असे संकट आले की हतबल होतो. माणसाला सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. महागडे वैद्यकीय उपचार परवडत नाही म्हणून आजारपण अंगावर काढून कसाबसा जगत होता. सरकारकडूनही सर्वसामान्यांना अपेक्षित मदत मिळत नव्हती. २०१४ च्या निवडणुकानंतर मात्र सरकार बदलले आणि सर्वसामान्यांचा सरकारकडून विचार होऊ लागला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विविध प्रकारच्या विकास योजना सुरू केल्या. नागरिकांना चांगल्या आणि माफक दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य सेवा सुरू केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गरजूंना आरोग्य उपचारांसाठी निधी उपलब्ध करून दिला. अशाप्रकारे देवेंद्रजी वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राचे आरोग्य दूत म्हणून जनतेची आरोग्य सेवा करत आहेत.
देशातील नागरिक सक्षम आणि निरोगी असतील, तरच देश विकसित होऊ शकतो. या सुत्राचे पालन करत देवेंद्रजींनी आबालवृद्धांचे निरोगी आरोग्य हे नेहमीच केंद्रस्थानी ठेवले. खरेतर उत्तम आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो सर्वसामान्यांना मिळाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आलेली मरगळ दूर करत त्याला गती देण्याचे काम केले. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना केली. या कक्षाच्या माध्यमातून त्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २४ लाख रुग्णांना १७६१ कोटींची वैद्यकीय उपचारासाठी मदत केली. त्याचबरोबर ‘मिशन ध्वनी’ सारखा कार्यक्रम राबवून कर्णबधिर बालकांना श्रवणयंत्रे उपलब्ध करून दिली. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्स उभारली. कामगारांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात ७ रुग्णालये उभारली. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्वसामान्यांसह पांढरे रेशन कार्ड धारकांना ५ लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जात आहेत. राज्यात १०८ ठिकाणी डायलिसिस सेंटर्स उभारण्यात आली. जिल्हा रुग्णालयांना वैद्यकीय सहाय्य करत ती सुसज्ज करण्यात आली. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या धर्तीवर देवेंद्रजींनी नागपूरमध्ये अद्ययावत असे ४५० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल उभारले. त्याप्रमाणे एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ५०० मिलियन अमेरिकन डॉलर महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यासाठी मिळवले होते.
स्वच्छ मुख अभियानाची सुरुवात – Swachh Mukh Abhiyan
देवेंद्रजींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तरुणांचा सरकारी कामात हातभार लागावा, तसेच त्यांना प्रशासकीय सेवेचा अनुभव मिळावा. यासाठी ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ योजना सुरू केली. याच योजनेतील २०१८ च्या बॅचमधील विद्यार्थी डॉ. मयूर मुंढे याने सामाजिक आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील तोंडाच्या कर्करोगाची समस्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडली होती. त्या दरम्यान महाराष्ट्रात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक होते. यातून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या हास्याला ‘आरोग्यदायी’ बनवण्यासाठी देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिले ‘स्वच्छ मुख अभियान‘ सुरू करण्यात आले होते. मुख स्वास्थ्यासंदर्भात योजना राबवणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले होते.
देवेंद्रजींनी फक्त योजना सुरू केल्या नाहीत. तर त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या. वैयक्तिक पातळीवरही त्यांनी अनेकांना मदत केली. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान १२५ हून अधिक सभा घेणारे झंझावती नेतृत्व म्हणून देवेंद्रजी सर्वांना दिसत होते. पण त्याचवेळी कार्यकर्त्यांची काळजी घेणारे देवेंद्रजी ही अनेकांनी पाहिले. एका सभेला जात असताना देवेंद्रजींच्या गाड्यांचा ताफा नागपूरमधील टेकडी गणपती मंदिर परिसरातून जात असताना एक ६५ वर्षांचा अपघातग्रस्त माणूस देवेंद्रजींना रस्त्याशेजारी पडलेला दिसला. त्यावेळी देवेंद्रजींनी आपला ताफा थांबवून त्या जखमी व्यक्तीकडे धाव घेतली. सदर व्यक्ती गंभीरपणे जखमी असल्याने त्याला रक्ताच्या उलट्यासुद्धा होऊ लागल्या होत्या. त्यामुळे देवेंद्रजींनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून उपचारांची व्यवस्था केली. रुग्णवाहिका जाईस्तोवर देवेंद्रजी घटनास्थळीच थांबले आणि सदर व्यक्तीच्या उपचारांची व्यवस्था लावून पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. हीच आहे देवेंद्रजींची सर्वसामान्यांच्या प्रती तळमळ.
एवढेच नाही तर रायगड जिल्ह्यातील वेदांत ठाकरे या लहान मुलाला थॅलेसेमिया झाला होता. यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात तो अंथरूणाला खिळून होता. देवेंद्रजींपर्यंत ही गोष्ट येताच, त्यांनी ४० लाखांची मदत वेदांतच्या उपचारासाठी केली. शस्त्रक्रिया आणि योग्य उपचारानंतर वेदांत स्वत:च्या पायावर चालू लागला. एका साध्या कामगाराला हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी मदत असो वा महाराष्ट्रातील पैलवान विजय डोईफोडे यांच्या उपचारांचा खर्च असो. देवेंद्रजी मदतीसाठी कायम तत्पर असतात. अशा अनेक लोकांच्या आयुष्यात देवेंद्रजी देवदूताप्रमाणे धावून आले आहेत. त्यामुळे एक फोन, टीव्हीवरील बातमी किंवा अगदी तोंडी निरोप मिळाला तरी देवेंद्रजी स्वत: लक्ष घालून रुग्णांना वैद्यकीय सहाय्य मिळवून देतात. देवेंद्रजींनी स्थापन केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वैयक्तिक स्तरावर अनेकांना मदत करण्यात आली. तसेच ४५० हून अधिक धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून १५ लाख रुग्णांवर ८४२ कोटींचे उपचार करण्यात आले. एवढेच नव्हे, तर कोविडच्या काळात सरकार नसतानाही विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्रजींनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. आरोग्यसेवकांना विमा संरक्षण दिले. २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींनी वर्ल्ड बँकेच्या मदतीने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला ५,००० कोटी रुपयांचे बूस्टर डोस दिले. शासकीय रुग्णालयात विविध आरोग्य चाचण्या मोफत केल्या. २०१६ मध्ये सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेची रक्कमही १ लाखांहून ५ लाखांपर्यंत वाढवली. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. चांगल्या उपचारांविना आपली प्रिय व्यक्ती गमावण्याचे दु:ख देवेंद्रजींनी सोसले आहे. त्यामुळे असे दु:ख इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये, याकरीता ते रात्रं-दिवस कार्यरत असतात.
संबंधित ट्विट्स
9 वर्ष सेवा, सुशाशन आणि गरीब कल्याण !
सर्वांसाठी स्वस्त, सुलभ आरोग्यसेवा
भव्य आरोग्य शिबीर…
आरोग्य सुविधा…
आरोग्य सर्वांसाठी… आयुषमान भारत !
एक नवा भारत… स्वस्थ मन-सुदृढ शरीर-निरोगी भारत !
संबंधित व्हिडिओ
आरोग्यसेवा हीच खरी सेवा
मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालयाच्या कक्षामुळे गरजूंना मदत
‘दवाखाना आपल्या दारी’ योजनेमार्फत ग्रामीण भागात आरोग्य सेवा
राज्यातील 12 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत