समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना योग्य आणि स्वस्त दरात आरोग्य उपचार मिळावेत. यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनामूल्य अटल आरोग्य महाशिबिर आयोजित करण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेनुसार संपूर्ण राज्यासह फडणवीस यांनी आपल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातही २०१८ मध्ये विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या माध्यमातून जवळपास ४२ हजार १५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.
नागपूर दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह नागपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या परिसरात अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. २१ ते २६ ऑक्टोबरपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांची प्राथमिक तत्वावर आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे योग्य निदान करुन आवश्यक असलेल्या रुग्णांची २८ ऑक्टोबर २०१८ रोजी देशातील नामांकित डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्याच्या विविध संकल्पना राबिवल्या होत्या. राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना स्वस्त दरात चांगले उपचार मिळावेत यावर त्यांनी विशेष भर दिला होता. जसे की, मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्पनेतून १७ लाख जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. त्याचबरोबर लहान मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा उपक्रमही राबविण्यात आला. २०१७ मध्ये त्यांनी मौखिक आरोग्याबाबतही जनजागृती अभियान राबविले होते. अनेक मोठमोठे आजार होण्यामागे मौखिक आरोग्य कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे त्यांनी राज्याचा आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाला त्यावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच पद्धतीने देवेंद्रजींनी राज्यात विनामूल्य अटल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ४५० हून अधिक डॉक्टर, १०० नर्सेस, ४५० आशा वर्कर, १०० फार्मासिस्ट आणि जवळपास २५०० स्वयंसेवक उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या परिसरात पार पडलेल्या अटल महाआरोग्य शिबिरात ४२,१५५ रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींवर उपचार करण्यात आले. तसेच ब्रेस्ट कॅन्सरच्या १८७ कॅन्सरग्रस्त महिलांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठीच्या सूचना देण्यात आल्या. जवळपास १५०० नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून वैद्यकीय सहायता निधीमार्फत तातडीच्या उपचारासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ४५० पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरातून आपली सेवा गोरगरिबांना दिली. ज्या रुग्णांना हृदयरोग, मेंदूरोग व कर्करोगाचे निदान झाले, अशा रुग्णांची विनामूल्य शस्त्रक्रिया या आरोग्य अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली. गरजू लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून ते आरोग्यसेवेपासून वंचित राहू नयेत. हा दृष्टिकोन ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचे आयोजन केले होते.