महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास, देशांतर्गत आणि परकीय गुंतवणुकीत वाढ, मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये विस्तारलेले मेट्रोचे जाळे आणि जलसंधारण क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबईतील टीआयईकॉन या संस्थेने महाराष्ट्राचे सेवक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या हस्ते देण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात राहून केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या संस्थेकडून पुरस्कार मिळणे ही तशी मोठी गोष्टी नाही. ते राज्याचे प्रमुख असल्याने असे कितीतरी पुरस्कार त्यांना सहज मिळू शकतात. पण देवेंद्र फडणवीस याला अपवाद ठरतात. कारण जनतेनेच त्यांना इतके पुरस्कार बहाल केले आहेत. त्यावरून त्यांच्या कार्याची मोजदाद आपल्याला लावता येऊ शकेल. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत; पण त्याचबरोबर ते महाराष्ट्र सेवक आहेत. त्यांनी महाराष्ट्राची सेवा करण्याचे जे व्रत स्वीकारले आहे. त्यातून त्यांच्या कार्याचा अंदाज येतो.
महाराष्ट्राच्या विकासाचे नेतृत्व!
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हा त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी या अनुभवाशिवाय इतर मंत्री, राज्यमंत्री असा कोणताही अनुभव नव्हता. तरीही त्यांनी २०१४ ते २०१९ अशी ५ वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. या ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भरमसाठ कार्यक्रम राबवले. इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सोयीसुविधा, शेती, दुष्काळ, परकीय गुंतवणूक, युवकांना प्रोत्साहन, उद्योगधंदे, मेट्रो अशा कितीतरी कामांमुळे त्यांची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली. इन्फ्रा मॅनपासून ते मेट्रो मॅन, वॉटर मॅन, इन्व्हेस्टमेंट पूलर अशी विशेषणे त्यांच्या नावासोबत जोडून त्यांना अनोखे पुरस्कार महाराष्ट्राच्या जनतेने बहाल केले आहेत.
गुंतवणुकीचा महासंकल्प
महाराष्ट्र राज्य हे सध्या भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले. २०२५ चा विचार केला तर अवघ्या ९ महिन्यात देवेंद्र फडणवीस सरकारने १ लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. दावोसमध्ये झालेल्या विक्रमी सामंजस्य करारामधून ही गोष्ट दिसून आली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वाढती स्टार्टअप्सची संख्या हेच दर्शवत आहे की, उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्र बेस्ट राज्य ठरत आहे. महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही धोरणामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली. महाराष्ट्र आता भारताची नवी स्टार्टअप राजधानी बनली आहे. मुंबईतील पायाभूत सोयींचा विचार करता मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू या प्रकल्पांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. यामुळे उद्योग, व्यवसाय करणाऱ्या लोकांचा वेळ वाचत आहे. प्रोडक्शन निर्माण करणाऱ्या कंपन्यांना कमी वेळेत जलद गतीने मालाची डिलेव्हरी करता येत आहे.
इन्फ्रामधील प्रकल्पांसोबतच राज्याची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्यातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड, मागेल त्याला शेततळे, नदीजोड असे प्रकल्प हाती घेतले आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक टंचाईसदृश गावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सेवक म्हणून काम करताना मेट्रो मॅन, इन्फ्रा मॅन, वॉटर मॅन अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करून प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. राजकारणाच्या परिघाबाहेर जाऊन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची दखल देशभर घेतली जात आहे. त्यामुळे हा फक्त एक पुरस्कार नाही; तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडून सातत्याने होत असलेले प्रयत्नांची पोचपावती आहे.