Election Winner: देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षातून घडलेली महाराष्ट्राची विजयगाथा
देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षातून घडलेली महाराष्ट्राची विजयगाथा
देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श उभा करणारा प्रवास आहे. जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला संघर्षातून विजय मिळवण्याचा मार्ग दर्शवतो. १९९२ मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीपासून सुरू झालेला हा प्रवास, २०१४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत, त्यानंतर २०२२ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि २०२४ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला आहे. दूरदृष्टी, प्रखर नेतृत्व, अभ्यासू, महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, वॉटरमॅन, मेट्रोमॅन, महाराष्ट्र सेवक आणि निवडणुकीच्या विजयातील चाणक्य म्हणून परिचित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली अमिट छाप सोडली आहे. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी नागपूरचे महापौर पद भूषविल्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये राज्याच्या राजकारणात आपले पाऊल ठेवले. १९९९ पासून ते सलग ६ टर्म नागपूर दक्षिण आणि नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातून महाराष्ट्र विधिमंडळात नागपूरचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. या प्रवासात त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावताना सरकारवर कठोर टीका करत महाराष्ट्रासाठी विकासात्मक भूमिका राबवली.
२०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला वेगाने विकासाच्या मार्गावर नेले. २०२२ नंतरच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी यशस्वी नेतृत्वाचे नवे मापदंड प्रस्थापित केले. तर २०२४ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांची चाणक्यनीति विशेषतः २०१६, २०१८, २०१९, २०२०, २०२२ आणि २०२४ मधील राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांत दिसून आली. राष्ट्रीय पातळीवर तसेच विविध राज्यातील प्रादेशिक निवडणुकांसाठी त्यांनी रचलेल्या रणनीतींमुळे भाजपने चांगले यश मिळवले. २०१४ पासून लोकसभा, विधानसभा, महापालिका, ग्रामपंचायत यांसारख्या विविध निवडणुकांत त्यांनी पक्षाचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली. त्यांच्या या विजयगाथेचा प्रवास (देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द) महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. देवेंद्रजींनी फक्त निवडणुकांमधून विजय मिळवला नाही, तर राज्याच्या जनतेचे विश्वासू नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली.
१९९२
वयाच्या २१ व्या वर्षी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली!
१९९२ मध्ये नागपूरमधील रामनगर या वॉर्डमधून निवडणूक लढवून पहिल्यांदा नगरसेवक बनले. त्यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांमध्ये देवेंद्रजी सर्वांत तरुण नगरसेवक होते. त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेतून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती. राजकीय जीवनातील पहा विजय म्हणता येईल.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१९९२
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१९९२
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
१९९२
पहिल्या ५ वर्षांतील कामांमुळे दुसऱ्या टर्ममध्ये नागपूरच्या महापौरपदी विराजमान
१९९२ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर ते पुन्हा एकदा रामनगर वॉर्डमधून उभे राहिले आणि जिंकूनही आले. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी नगरसेवक पदाची जबाबदारी आणि महापालिकेची कार्यपद्धती समजून घेतल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना याचा खूप फायदा झाला. नगरसेवकपदाबाबत त्यांचा एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. जेव्हा त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये एका मैदानाला कुंपण घालायचे होते. तेव्हा नेहमीच्या प्रघाताप्रमाणे महापालिकेने काम मंजूर केले की, ठेकेदार त्या कामाची फाईल तयार करून ती स्वत: मंजूर करून घ्यायचा. पण देवेंद्रजींनी ही चैनच ब्रेक केली. त्यांनी स्वत: या कामाची फाईल तयार करून ती प्रत्येक टेबलवरून पास करून ते काम मार्गी लावले होते. त्यामुळे त्यांच्या वॉर्डमधील अनेक कामे दलालांच्या हस्तक्षेपाशिवाय झाली. त्यांच्या या कामाच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाने त्यांना महापालिकेच्या महापौरपदी बसवले. ते ५ मार्च १९९७ ते ६ फेब्रुवारी १९९८ आणि ७ फेब्रुवारी १९९८ ते ४ फेब्रुवारी १९९९ या कालावधीत नागपूर शहराचे महापौर होते. ते भारतातील सर्वांत दुसरे तरुण महापौर म्हणून ओळखले जातात. त्यावेळी त्यांचे वय २७ वर्षे होते. महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध प्रकारची विकासकामे केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
५
मार्च १९९७
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
५
मार्च १९९७
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
५
मार्च १९९७
नागपूर महानगरपालिकेत ७ वर्षे काम केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९९९ मध्ये ते नागपूर पश्चिम मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीसाठी उभे राहिले. १९९९ मध्ये निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात ५ सप्टेंबर १९९९ आणि ११ सप्टेंबर १९९९ अशा दोन टप्प्यात निवडणुका घेतल्या होत्या. याचा निकाल ६ ऑक्टोबर १९९९ रोजी जाहीर करण्यात आला. विधानसभेच्या या पहिल्याच निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना ९४,८५३ मते मिळाली. त्यांचा ९,०८७ मतांनी विजय झाला. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ४८.६६ टक्के इतकी होती. या मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या ३,९९,१९५ इतकी होती. त्यातील १,९८,८४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. नागपूर पश्चिम मतदारसंघातून १९९९ मध्ये एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
७
ऑक्टोबर १९९९
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
७
ऑक्टोबर १९९९
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
७
ऑक्टोबर १९९९
GR
1999-Vidhan-Sabha-Result.pdf
×
Useful Links
Information Not Available
१६
ऑक्टोबर २००४
नागपूर पश्चिममधील मतदारांचा देवेंद्रजींना सकारात्मक प्रतिसाद
२००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर पश्चिम मतदारसंघाने विशेष लक्ष वेधून घेतले होते. यासाठी १३ ऑक्टोबर २००४ रोजी निवडणूक घेण्यात आली होती. त्याचा निकाल १६ ऑक्टोबर २००४ रोजी जाहीर झाला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात एकूण ४ लाख ४४ हजार ८४६ मतदार होते. त्यातील २ लाख ३२ हजार ६१८ मतदारांनी मतदान केले. त्यातील १ लाख १३ हजार १४३ मते देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. ते या निवडणुकीत १७,६१० मतांच्या फरकाने जिंकले. मागील टर्मच्या तुलनेत या निवडणुकीत त्यांनी दुप्पट मार्जिनने ही निवडणूक जिंकली होती. मतदारांनी दर्शविलेला विश्वास आणि त्यातून मिळालेल्या जनादेशामुळे या मतदारसंघात सकारात्मक बदल घडवण्याची संधी निर्माण झाली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१६
ऑक्टोबर २००४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१६
ऑक्टोबर २००४
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
१६
ऑक्टोबर २००४
GR
2004-Vidhan-Sabha-Result.pdf
×
Useful Links
Information Not Available
२२
ऑक्टोबर २००९
नागपूर दक्षिण पश्चिममधील विजयासह देवेंद्र फडणवीस यांची विजयी हॅटट्रीक!
२००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस २७,७७५ मतांचे मताधिक्य मिळवत विजयी झाले. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे देवेंद्र फडणवीस यांना नागपूर पश्चिम हा मतदारसंघ सोडून नागपूर-दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली होती. ही निवडणूक १३ ऑक्टोबर २००९ रोजी पार पडली. तर निवडणुकीचा निकाल २२ ऑक्टोबर २००९ रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. मतदारसंघातील एकूण ३ लाख ५० हजार ६७१ मतदारांपैकी १ लाख ७४ हजार ६४९ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील ८९,२५८ मते देवेंद्र फडणवीस यांनी मिळाली. त्यांनी विरोधी पक्षातील उमेदवाराचा २७,७७५ मतांनी पराभव केला. हा विजय केवळ उमेदवाराच्या प्रभावी नेतृत्वाचा व मतदारांच्या पाठिंब्याचा प्रतीक होता, तर नागपूर पश्चिम मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्यांच्या कामगिरीवरील विश्वासही दर्शवणारा होता. या निवडणुकीने नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात नवी राजकीय दिशा ठरली आणि विकासासाठी नवे मार्ग मोकळे झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
२२
ऑक्टोबर २००९
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
२२
ऑक्टोबर २००९
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
२२
ऑक्टोबर २००९
GR
2009-Vidhan-Sabha-Result.pdf
×
Useful Links
Information Not Available
११
एप्रिल २०१३
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आमदार देवेंद्र फडणवीस यांची पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून घोषणा केली. त्यांच्या अगोदर या पदावर सुधीर मुनगंटीवार हे प्रदेश अध्यक्ष होते. या निवडीमुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. या जबाबदारीबरोबरच काही आव्हानेही आहेत. त्यात प्रामुख्याने २०१४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, शिवसेनेसोबत असलेली युती, पक्षाचा राज्यात विस्तार करणे, राज ठाकरे यांचा नवीन पक्ष आणि सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरून दूर ठेवणे, अशी प्रमुख आव्हानं आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
११
एप्रिल २०१३
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
११
एप्रिल २०१३
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
११
एप्रिल २०१३
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राजकीय मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. २०१३ मध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू होते. केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर भाजपच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला. त्यामुळे भाजपची ग्रामीण व शहरी भागांतील पकड मजबूत झाली. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राबवलेल्या मॉडेलची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली गेली. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेना युती मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर शेतकरी, तरुण, व्यापारी, महिला आणि शहरांतील मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवली.
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांचे मतदान ४ टप्प्यांत पार पडले. यामध्ये पहिला टप्पा १० एप्रिल, दुसरा १७ एप्रिल, तिसरा २४ एप्रिल आणि चौथा ३० एप्रिलमध्ये पार पडला. त्यानंतर १६ मे २०१४ रोजी लागलेल्या निकालात महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीला मोठे यश मिळाले. भाजपाचे २३ तर शिवसेनेचे १८ असे एकूण ४१ खासदार जिंकून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपने चांगले यश मिळवले. ज्यामुळे पक्षाची स्थिती मजबूत झाली आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा मार्ग सुलभ होण्यास मदत झाली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१६
मे २०१४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१६
मे २०१४
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
१६
मे २०१४
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय!
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे १२२ आमदार निवडून आले. भाजपाचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठ विजय आहे. २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षाचे स्टार कॅम्पेनर होते. त्यांच्या प्रभावी प्रचाराने पक्षाला राज्यात मोठे यश मिळाले. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना १ लाख १३ हजार ९१८ मते मिळाली. त्यांनी ५८,९४२ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. हा फरक तब्बल ३०.८० टक्के इतका होता. त्यांच्या या विजयामागे लोकप्रियता आणि जनतेचा विश्वास दिसून येतो. या विजयातून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१९
ऑक्टोबर २०१४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१९
ऑक्टोबर २०१४
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
१९
ऑक्टोबर २०१४
GR
BJP.pdf
×
Useful Links
Information Not Available
३१
ऑक्टोबर २०१४
देवेंद्र फडणवीस यांचा वानखेडे स्टेडिअमवर मुख्यमंत्री म्हणून शपथविधी
२०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यात १५ ऑक्टोबर २०१४ रोजी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने सर्व मतदारसंघात चौरंगी लढतीची चिन्हे दिसून आली. लोकसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मोडीत काढून विधानसभेच्या निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे भाजपा आणि शिवसेना यांच्यातही जागावाटपावरून खडाजंगी झाल्याने या दोन्ही पक्षांनीही २५ वर्षांची युती मोडीत काढून स्वतंत्र निवडणुका लढवल्या. दरम्यान, २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी ही त्यांच्याकडेच आली. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भाजपाला महाराष्ट्रात १२२ जागांवर विजय मिळाला. देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. या निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. पण भारतीय जनता पक्षा सर्वाधिक १२२ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. २००९ च्या निवडणुकीत भाजपाला अवघ्या ४६ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये त्यात ७६ जागांची वाढ होऊन भाजपाला १२२ जागा मिळाल्या होत्या. तर पक्षाला एकूण मतांपैकी १ कोटी ४७ लाख ९ हजार ४५५ मते मिळाली होती. मागील मतांच्या तुलनेत यामध्ये २७.८ टक्क्यांनी वाढ झाली होती.
देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग आणि पक्षाचे राष्ट्रीय जनरल सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधिमंडळात सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आली. सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचे नेते म्हणून मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी शपथ घेतली. त्यांच्या सरकारने १२ नोव्हेंबर २०१४ रोजी आवाजी मतदानाने विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
३१
ऑक्टोबर २०१४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
३१
ऑक्टोबर २०१४
विधानसभेतील ऐतिहासिक विजयानंतर राज्यसभेतील जागांमध्ये भाजपाची वाढ
राज्यसभेच्या ६ जागांसाठी महाराष्ट्रात ११ जून २०१६ मध्ये निवडणुका लागल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३ उमेदवार निवडणून आले. त्यात पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले. भाजपाने प्रथमच १०० चा आकडा पार करत विधानसभेच्या १०५ जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यात भाजपाच्या आमदारांची संख्या वाढली. परिणामी राज्यसभेच्या ६ जागांपैकी ३ जागांवर भाजपाचे खासदार निवडून आले. एकूण २०१४ च्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे राज्यसभा आणि विधानपरिषदेवरील खासदार, आमदारांची संख्या वाढण्यास मदत झाली. राज्यसभेसाठी देण्यात येणारे उमेदवार त्यांच्यासाठी ठरवण्यात आलेला पसंतीक्रमानुसार मतांचा कोटा यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
११
जून २०१६
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
११
जून २०१६
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
११
जून २०१६
GR
Information Not Available
Useful Links
Information Not Available
१९
नोव्हेंबर २०१६
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपची मुसंडी
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने दोन जांगावर विजय मिळवला. तर काँग्रेस २, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोंदिया या सहा स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी १९ नोव्हेंबरला मतदान झाले. यवतमाळमधून शिवसेनेचे तानाजी सावंत, नांदेडमधून काँग्रसचे अमर राजूरकर, गोंदियातून भाजपाचे परिणय फुके, जळगावमधून शिवसेना-भाजपा युतीचे चंदू पटेल, सातारा-सांगलीतून काँग्रेसचे मोहनराव कदम आणि पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले विजयी झाले. या सहा जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्चस्वाची चाचपणी करण्याच्यादृष्टीने विधानपरिषद निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी आपली नीती वापरुन भाजपाचे दोन आमदार निवडून आणले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१९
नोव्हेंबर २०१६
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१९
नोव्हेंबर २०१६
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
१९
नोव्हेंबर २०१६
२०१७ हे वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय धुरंधर नीतीचा परिचय देणारे वर्ष ठरले. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांनी निवडणुकांच्या रणधुमाळीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. सत्तेतील सहकारी पक्ष विरोधात असतानाही भाजपाची कामगिरी उजवी ठरली. भाजपाने आठ महानगरपालिका जिंकल्या. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षाने ५० टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या. पक्षाच्या या विजयात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. राज्यातील विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख होऊ लागला. अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातील ‘चाणक्य’ असे नाव बहाल केले.
राज्यातील १६ जिल्ह्यातील एकूण ३,१३१ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ७ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान झाले. सरासरी ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. या निवडणुकीत नगरपालिकांप्रमाणे पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्याचे ठरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली. पहिल्या टप्प्यात मतदान झालेले जिल्हे आणि जागा पुढीलप्रमाणे आहेत. नाशिक (१५०), धुळे (९६), जळगाव (१०१), नंदुरबार (४२), अहमदनगर (१९४), औरंगाबाद (१९६), बीड (६५५), नांदेड (१४२), परभणी (१२६), जालना (२२१), लातूर (३२४), हिंगोली (४६), अकोला (२४७), यवतमाळ (८०), वाशिम (२५४), बुलडाणा (२५७). या मतदानाची मतमोजणी ९ ऑक्टोबर २०१७ ला पार पडली. थेट सरपंच निवडणुकीचा भाजपाला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. एकूणच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५० टक्के जागा जिंकल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने २,९७४ जागांमधून १,४५७ जागांवर विजय मिळवला आहे. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ३,६९२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत एकूण ८१ टक्के मतदान झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
९
ऑक्टोबर २०१७
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
९
ऑक्टोबर २०१७
२०१८ मध्ये राज्यसभेच्या ६५ सेवानिवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी राज्यसभेची निवडणूक आयोजित करण्यात आली होती. यासाठी एकूण तीन निवडणुका घेण्यात आल्या. त्यातील महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या ६ जागांसाठी २३ मार्च २०१८ रोजी राज्यसभेची निवडणूक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण १५ मार्च २०१८ रोजी झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे भाजपाचे ३ खासदार बिनविरोध निवडून आले. त्यात प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांचा समावेश होता. या ६ जागावरील खासदारांची टर्म २ एप्रिल २०१८ मध्ये संपणार होती. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन खासदार आणि भाजप, शिवसेनेचा प्रत्येकी एक खासदार होता. दरम्यान, सुरूवातीला या ६ जागांसाठी ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सर्वच पक्षांनी विजयासाठी कंबर कसण्याची तयारी केली होती. पण शेवटच्या क्षणी भाजपाकडून अर्ज दाखल केलेल्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सहाच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये देवेंद्रजींची चाणक्यनीती आणि शिष्टाई अशा दोन्ही गुणांची चुणूक दिसून आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
२३
मार्च २०१८
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
२३
मार्च २०१८
लोकसभेत पुन्हा एकदा महायुतीचा दणदणीत विजय; ४८ पैकी ४१ जागांवर विजय
महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुका ११ एप्रिल (७ जागा), १८ एप्रिल (१० जागा), २३ एप्रिल (१४ जागा) आणि २९ एप्रिल (१७ जागा) अशा ४ टप्प्यात पार पडल्या. या निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली होती. युतीतील जागावाटपानुसार भाजपाच्या वाट्याला २५ आणि शिवसेनेच्या वाट्याला २३ जागा आल्या होत्या. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. २३ मे रोजी लागलेल्या निकालात युतीने एकूण ४१ जागा जिंकल्या. भाजपाचे २५ पैकी २३ खासदार निवडून आले. त्यांना एकूण १ कोटी, ४९ लाख, १२ हजार १३९ मते मिळाली.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ची पुनरावृत्ती करत युतीला ४८ पैकी ४१ जागा जिंकून आपले राज्यातील वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस वरचढ ठरल्याचे बोलले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीने ४८ पैक ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपाने २६ लढवून २३ जागांवर तर शिवसेनेने २२ जागा लढवून १८ जिंकल्या होत्या. या दोन्ही निवडणुकीत विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जाते. त्यांनी आपल्या सहकारी पक्षांना नेहमीच सांभाळून घेतले. २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी त्यांना मराठा आरक्षण आणि दुष्काळामुळे शेतीवर आलेल्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी देवेंद्रजींनी ही दोन्ही प्रकरणे अत्यंत सक्षमपणे हाताळत मराठा समाजाला आतापर्यंतच्या इतिहासातील पहिले आरक्षण लागू केले. मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. २०१७ मध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वांत मोठी कर्जमाफी लागू केली. तर अशाप्रकारे देवेंद्रजींनी सरकारचे प्रमुख आणि पक्षातील राज्याचे नेते अशा दोन्ही भूमिका बजावून मतदारांपर्यंत आपली कामे पोहोचवण्यासाठी मेहनत घेतली. त्या मेहनतीला लोकसभेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
२३
मे २०१९
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
२३
मे २०१९
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
२३
मे २०१९
राज्याच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवत सलग ५ वेळा विधिमंडळात प्रवेश केला आहे. २१ ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल लागला. देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीत एकूण १ लाख ९ हजार २३७ मते मिळाली. त्यांनी ५६.८६ टक्के मते मिळवत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा ४९ हजार २८८ मतांनी पराभव केला. देवेंद्रजींच्या वैयक्तिक वियजाव्यतिरिक्त त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यात चांगले यश मिळाले. भाजपाचे एकूण १०५ आमदार निवडून आले आहेत. २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर लगेच २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. या सरकारचे मुख्य नेते म्हणून त्यांनी २०१४ ते २०१९ असे ५ वर्षे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यानंतर झालेल्या या निवडणुकीत त्यांचा पुन्हा एकदा करिष्मा पाहायला मिळाला. एकीकडे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या. दुसरीकडे त्यांनी महाजनादेश यात्रा काढून पक्षाचा राज्यभर प्रचार केला. एकूणच त्यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला दुसऱ्यांचा शंभरीचा आकडा पार करून देण्यात देवेंद्रजींचे मोठे योगदान राहिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
२४
ऑक्टोबर २०१९
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
२४
ऑक्टोबर २०१९
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
२४
ऑक्टोबर २०१९
अजित पवारांच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
२०१९च्या विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत असलेली २५ वर्षांची युती तोडली. त्यामुळे विधानसभेत सर्वाधिक १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला सत्ता स्थापन करता येत नव्हती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण हे सरकार फार काळ टिकले नाही. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
२३
नोव्हेंबर २०१९
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
२३
नोव्हेंबर २०१९
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
२३
नोव्हेंबर २०१९
GR
Information Not Available
Useful Links
Information Not Available
१०
नोव्हेंबर २०२०
बिहारमध्ये देवेंद्र फडणवीसांची कमाल; ७४ आमदारांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी टाकली. पक्षाने त्यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली. त्याबाबतचे पत्र फडणवीस यांना ३० सप्टेंबर २०२० रोजी देण्यात आले. बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्पा २८ ऑक्टोबर, दुसरा टप्पा 3 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर रोजी पार पडला. १० नोव्हेंबर रोजी लागलेल्या बिहारच्या निवडणुकांच्या निकालात भाजपाला ७४ जागा मिळाल्या तर जेडीयूला ४३, विकासशील इन्सान पार्टी ४ आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा यांना ४ जागा मिळाल्या आहेत. अशाप्रकारे एनडीएला बिहारमध्ये १२५ जागा मिळाल्या. ७४ जागा मिळवून भाजपा बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजपाला मागील निवडणुकीच्या तुलनेत २१ जागा जास्ती मिळाल्या आहेत. २०१५ मध्ये भाजपाला ५३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं बूथपर्यंत संघटन उभे केले होते. त्याचा फायदा पक्षाला झाला.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१०
नोव्हेंबर २०२०
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१०
नोव्हेंबर २०२०
तीन पक्षांच्या एकत्र येण्यामुळे आमचे आकलन चुकले - देवेंद्र फडणवीस
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेतील जागांसाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी निवडणुका झाल्या. या निवडणुकांचा निकाल ४ डिसेंबर रोजी लागला. पण या ५ जागांपैकी एकाच जागेवर भाजपाचा उमेदवार निवडून आला. उलट पुणे आणि नागपूरमधील पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपाला गमवावी लागली. याबाबत देवेंद्रजींनी यावेळच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल, तर तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याचे आमचे आकलन चुकले, आता आम्हाला कळले त्यानुसार आम्ही पुढील निवडणुकीत तयारीने उतरू, असे सांगत आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
४
डिसेंबर २०२०
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
४
डिसेंबर २०२०
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
४
डिसेंबर २०२०
गोव्याच्या निवडणूक प्रभारी पदी देवेंद्र फडणवीस; भाजपाचे घवघवीत यश
२०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय समितीने या पाच राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली. त्यात केंद्रीय नेतृत्वाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राला लागूनच असलेल्या गोवा राज्याच्या विधानसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशाने आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या सहीने देवेंद्र फडणवीस यांची गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड केल्याचे पत्र पाठवले. देवेंद्र फडणवीसांनी बिहार निवडणुकीत पार पाडलेली जबाबदारी लक्षात घेत, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली. गोवा हे तुलनेनं छोटे राज्य असले तरी, ते संवेदशनशील आहे आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
गोव्याच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर देवेंद्रजी तिथे दीड महिना तळ ठोकून होते. या दीड महिन्यात त्यांनी उमेदवारांची निवड, नेत्यांचे पक्ष प्रवेश, त्याचबरोबर ५० हून अधिक सभा घेतल्या. त्यांनी गोव्यातील ४० मतदारसंघ एका नेत्याची निवड केली होती. त्याच्याकडून त्यांना सर्व मतदारसंघाची बित्तंबातमी मिळत होती. त्यानुसार कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांनी गोव्यात विजय खेचून आणला. गोव्याच्या ४० जागांपैकी २० जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आणि पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्री पदी डॉ. प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१०
मार्च २०२२
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१०
मार्च २०२२
राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा महाविकास आघाडीला दे धक्का!
चुरशीच्या आणि सस्पेन्स राहिलेल्या राज्य सभेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अखेर भाजपने आपले तीन उमेदवार निवडून आणून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांच्या विजयाने देवेंद्र फडणवीस यांनी आपले इलेक्शन विनरचे कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित केले. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत विजयी झाले. पण पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे दोन उमेदवार विजयी होणार हे निश्चित होते. पण सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या लढाईत भाजपने बाजी मारत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर शिवेसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला. दरम्यान या निवडणुकीत दोन्ही बाजुच्या नेत्यांनी काही जणांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. त्यात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे, सुधीर मुनगंटीवर आणि रवि राणा या आमदारांचा समावेश होता. त्यात शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या मताचे गणित बिघडल्याचे दिसून आले. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि भाजपकडून कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
११
जून २०२२
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
११
जून २०२२
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
११
जून २०२२
विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्रजींची चाणक्यनीती ठरली सरस!
विधानपरिषदेच्या १० जागा रिक्त झाल्याने त्यासाठी २० जून २०२२ रोजी निवडणुका जाहीर झाल्या. रिक्त होणाऱ्या जागांमध्ये भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजित सिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि दिवंगत आर.एस. सिंह असे उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून दिवाकर रावते आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळक आणि संजय दौंड हे निवृत्त होत आहेत. या दहा जागांचा विचार करता पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीच्या ६ जागा आणि भाजपच्या ४ जागा निवडून येऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. कारण भाजप आणि मित्रपक्षाकडे ११३ तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. पण प्रत्यक्षात मात्र निवडणुकीतील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारली. या निवडणुकीत भाजपाने आपले पाच उमेदवार निवडून आणले आहेत. पाचव्या उमेदवारासाठी भाजपाकडे पुरेशी मते नसल्याने भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विजयामागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी कामी आल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडणुकीतील चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस (Election Winner Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येते.
भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये श्रीकांत भारतीय (३०), राम शिंदे (३०), प्रवीण दरेकर (२९), प्रसाद लाड (२८), उमा खापरे (२७), तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर (२८), एकनाथ खडसे (२९), शिवसेनेकडून आमश्या पाडवी (२६) आणि सचिन अहिर (२६) तर काँग्रेसकडून भाई जगताप (२६) हे विजयी झाले. भाजपने प्रसाद लाड यांनी रिंगणात उभे करून अधिकचा उमेदवार दिला होता. त्यामुळे प्रसाद लाड, भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांच्यात विजयासाठी काटे की टक्कर सुरू होती. पण अखेर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आणि प्रसाद लाड व भाई जगताप विजयी झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
२०
जून २०२२
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
२०
जून २०२२
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राईक रेट ४२.७३ टक्के, आघाडीपेक्षा दीड टक्के कमी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्य पिंजून काढले. लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी २६ मार्च २०२४ रोजी पहिली सभा चंद्रपूरमध्ये घेतली. तर शेवटची सभा १८ मे २०२४ रोजी भिवंडी येथे घेतली. या ५२ दिवसांच्या कालावधीत त्यांनी ११५ सभा घेतल्या. तर वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल, डिजिटल प्लॅटफॉर्म, मॅगझीन अशा जवळपास ६७ प्रकारच्या माध्यमांना मुलाखती दिल्या. राज्यभरात घेण्यात आलेल्या सभांमधून त्यांनी देशपातळीवरील अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेला विकास, आर्थिक धोरणे-सुधारणा, देशाच्या सुरक्षिततेविषयीचे मुद्दे, हिंदुत्व, खासदारांनी स्थानिक पातळीवर केलेली कामे आदी गोष्टी आपल्या भाषणांतून मांडल्या. लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात ५ टप्प्यात पार पडली. या टप्प्यानुसार त्यांनी विदर्भ, मराठवाडा, जळगाव, पुणे आणि मुंबईमध्ये सभा, रोड-शो, कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला चांगल्या जागा निवडून आल्या नसल्या तरी भाजपाचा स्ट्राईक रेट मात्र चांगला राहिला होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा फक्त १.१८ टक्के मते अधिक मिळाली. पण महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या तर युतीच्या १७ जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के तर महायुतीला ४२.७३ टक्के मते मिळाली. भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत १ कोटी ४९ लाख ६६ हजार ५७७ मते मिळाली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१८
मे २०२४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१८
मे २०२४
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
१८
मे २०२४
विधानपरिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून महायुतीचा आघाडीला जोरदार धक्का!
लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी तयारी करत आहे. पण या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली होती. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनीतीमुळे या निवडणुकीत महायुतीने ११ पैकी ९ जागा जिंकून भरघोस यश मिळवले आहे. तर महाविकास आघाडीचे ३ पैकी २ उमेदवार विजयी झाले. यामध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलिंद नार्वेकर विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला.
विधानपरिषदेच्या या निवडणुकीत उमेदवारांना विजयी होण्यासाठी २३ मतांचा कोटा होता आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रणनीति आखली होती. त्यानुसार सर्वात पहिला विजय भाजपचे योगेश टिळेकर यांचा जाहीर झाला. त्यानंतर अमित गोरखे, पंकजा मुंडे, परिणय फुके आणि त्यानंतर रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत हे विजयी झाले. त्याच दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
१२
जुलै २०२४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
१२
जुलै २०२४
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
१२
जुलै २०२४
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाची तिसऱ्यांदा शंभरी पार!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचे स्टार कॅम्पेनर आणि राज्यातील प्रमुख नेते म्हणून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात प्रचाराचा झंझावात केला. त्यांनी एकूण ६४ ठिकाणी रॅली, रोड शो आणि जाहीर सभा घेतल्या. ६४ सभांपैकी बहुतांश म्हणजे जवळपास ५० एक सभा या दिवाळीनंतर अवघ्या १३ दिवसात घेतल्या. शेवटची ६४ वी सभा त्यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये घेतली. निवडणुकांच्या सभेच्या निमित्ताने देवेंद्रजींनी २५ हून अधिक जिल्ह्यात प्रवास केला. ज्या जिल्ह्यांमध्ये देवेंद्रजींना वेळेअभावी जाता आले नाही. तिथे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. सभांमधून त्यांनी शेतकर्यांना मोफत वीज, सौरकृषीपंप, एक रुपयांत पीकविमा, किसान सन्मान निधीमध्ये वाढ, पिकांच्या एमएसपीसाठी भावांतर योजना, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, अर्ध्या तिकिटात महिलांना एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दिदी आदी योजनांवर भर सरकारची बाजू मांडली. त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेतील अनुदान १५०० वरुन २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासोबत सिंचन प्रकल्प, उद्योग, रोजगार आदी मुद्द्यांवर भर देत महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला.
२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीची संपूर्ण धुरा ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. वैयक्तिक त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून १ लाख २९ हजार ४०१ मते मिळवत मोठा विजय मिळवला. त्यांचे विजयाचे मार्जिन ३९,७१० इतके राहिले. तर त्यांना एकूण ५६.८८ टक्के मते मिळाली. तर राज्यात भाजपाने १५२ जागा लढवून १३२ जागा जिंकल्या. भाजपाचा स्ट्राईक रेट जवळपास ८७ टक्के राहिला. शिवसेनेने ८१ जागा लढवत ५७ जागा जिंकल्या. शिवसेनेचा स्ट्राईक रेट ७० टक्के राहिला. राष्ट्रवादीने ५२ जागा लढवत ४१ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट ७८ टक्के राहिला. एकूण महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला. या निवडणुकीत भाजपला २६.७७ टक्के मते मिळाली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२.३८ टक्के आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ९.०१ टक्के मते मिळाली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
२३
नोव्हेंबर २०२४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
२३
नोव्हेंबर २०२४
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
२३
नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपा वैयक्तिक १३२ जागा जिंकून राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. तर महायुतीच्या माध्यमातून भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीतील सर्वांत मोठा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने प्रभावी प्रचार करून, पक्षाच्या संघटन कौशल्याचा खुबीने वापर करून मोठे यश मिळवले. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील मतदारांचा विश्वास संपादन करण्यास देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. ज्यामुळे महायुतीला बहुमत मिळाले तर भाजपाचे १३२ आमदार निवडून आले. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Photos & Video -
५
डिसेंबर २०२४
Photo Gallery
Information Not Available
YouTube
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित Social Media Buzz -
५
डिसेंबर २०२४
Facebook
Information Not Available
Twitter
Information Not Available
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित GR & Other Links -
५
डिसेंबर २०२४
GR
Information Not Available
Useful Links
Information Not Available
महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलाचा शिल्पकार
देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, दूरदृष्टी आणि प्रेरणादायी यश यांचा संगम असल्याचे दिसून येते. १९९२ मध्ये नगरसेवक म्हणून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी फक्त सत्ता मिळवली नाही, तर आपल्या चाणक्यनीतीने ती गावागावापर्यंत पोहचवून पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांबरोबरच राज्यसभा, विधानपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी रणनीती आखून त्यात यश देखील मिळवले. त्यांच्या राजकीय प्रवासात महाराष्ट्राला एक नवीन ऊर्जा असलेला, विश्वासू आणि राज्याला दिशा देणारा नेता मिळाला. त्यांनी वैयक्तिक पातळीवर मिळवलेले यश हे राज्याच्या प्रगतीसाठी तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या विजयगाथेशी संबंधित इतर लेख