देवेंद्र फडणवीसच का? | Why Devendra Fadnavis

जपानचा काउन्सिल जनरल म्हणून मुंबईत येणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे आणि जपान सरकारच्या वतीने मी श्री देवेंद्र फडणवीस यांना ही अप्रतिम मानद पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मला वाटते की, कोयासन विद्यापीठाने भारतातील एखाद्या व्यक्तीला दिलेली ही पदवी किती महत्त्वाची आहे, हे तुम्हाला कदाचित समजले नाही. कारण 120 वर्षांमध्ये प्रथमच अशी पदवी देणे निश्चितच महान आहे.

मुळात कोयासन विद्यापीठाचा इतिहास प्रत्यक्षात 1,200 वर्षांचा आहे. आधुनिक शिक्षण प्रणाली म्हणून कोयासन विद्यापीठाची स्थापना भले 120 वर्षांपूर्वी झाली असेल परंतु, शैक्षणिक प्रणाली म्हणून त्याची सुरुवात 9व्या शतकात झाली. म्हणून कोयासन विद्यापीठ हे जपानमधील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठ, शैक्षणिक प्रणालींपैकी एक आहे. त्यामुळे केवळ 120 नव्हे 1,200 वर्षांच्या काळात भारतातील या अद्भुत व्यक्तीमत्वाला विद्यापीठाकडून दिलेली ही पहिली मानद डॉक्टरेट पदवी आहे. कृपया समजून घ्या की, कोयासन विद्यापीठ खरोखरच काहीतरी विशेष आहे.

WHY DEVENDRA FADNAVIS?
WHY DEVENDRA FADNAVIS?

कोयासन विद्यापीठ भारतीय लोकांना माहित नसेल पण, जपानमध्ये बौद्ध धर्माचा पहिला टप्पा म्हणून ते खूप महत्त्वाचे आहे. कू काई यांनी नवव्या शतकात या विद्यापीठाची स्थापना केली. कू काई हे भारतातील आदिशंकराचार्यांसारखे आहेत. ज्या प्रमाणे आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माला उच्च स्थानावर नेले त्याचप्रमाणे कू काई यांनी देखील भारताचा बौद्ध धर्म जपानमध्ये वाढवला. सहाव्या शतकात कू काई यांनी बौद्ध धर्माला आंतरराष्ट्रीय धर्मात रुपांतरित केले. त्यावेळी कोयासन हे त्याचे केंद्र होते. म्हणूनच जपानी लोक कोयासन विद्यापीठ महत्त्वाचे मानतात. मी म्हणत आहे की, हा खरोखर खरोखर जपानी लोकांसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी, तुम्हा सर्वांसाठी एक विशेष कार्यक्रम आहे.

जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले की, कोयासन विद्यापीठ आपल्या इतिहासात प्रथमच मानद पदवी देत आहे तेव्हा मला आश्चर्य वाटले की, हे विद्यापीठ मानद पदवी देत आहे. नंतर मला समजले की, ती अन्य कोणा व्यक्तीला नाही तर ती श्री.फडणवीस यांनी दिली जाणार आहे. ते या वर्षी जपानला सरकारचे अधिकृत पाहुणे म्हणून जपानला आले आणि त्यांनी त्यांची दूरदृष्टी मांडली ते जपानमधील अनेक मान्यवरांना भेटले आणि विशेषतः त्यांनी अनेक व्यावसायिक बैठका घेतल्या. त्यांनी अनेक व्यावसायिक नेत्यांची भेटी घेतल्या. यातून जपान ने भारतात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वोत्तम ठिकाण आहे, असे निश्चित केले. त्यामुळेच आता अनेक जपानी कंपन्या महाराष्ट्र हे भारतातील सर्वोत्तम गुंतवणुकीचे ठिकाण मानतात. त्याच्या यशाबद्दल धन्यवाद.

ते उत्कृष्ट नेते आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने ते महाराष्ट्रातील उत्कृष्ट नेते आहेत. केवळ व्यापारी नेते किंवा राजकारणी म्हणून नव्हे तर, ते एक अद्भुत व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्या जपान भेटीचे आयोजन करण्याच्या प्रक्रियेत मला त्यांना अनेकदा भेटण्याचे आणि त्यांच्या दूरदृष्टीबद्दल चर्चा करण्याचे प्रसंग आले. मी त्याच्या मानवी गुणाने खूप प्रभावित झालो. ते खरोखरच एक अद्भुत व्यक्ती आहेत.
तुम्हाला माहिती आहे की, कोयासन विद्यापीठाची ही मानद डॉक्टरेट पदवी वैज्ञानिक कामगिरीसाठी नाही तर, ती त्यांच्या मानवतेबाबतच्या दृष्टीकोनासाठी देण्यात आली आहे. कोयासन विद्यापीठाने त्यांना महाराष्ट्रात शांतता आणि समृद्धी स्थापित करणारे भारतातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जपान सरकारच्या वतीने आणि एक व्यक्ती म्हणून मी श्री. फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *